Vastu Tips: घरात पूर्वजांचा फोटो लावण्यापूर्वी 'ही' बाब लक्षात ठेवा, अन्यथा अडचणीत होईल वाढ

वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक वस्तूला महत्त्व आहे. त्यामुळे कोणती वस्तू घरात कोणत्या ठिकाणी असावी याबद्दल सांगितलं आहे.

Updated: Jun 14, 2022, 04:31 PM IST
Vastu Tips: घरात पूर्वजांचा फोटो लावण्यापूर्वी 'ही' बाब लक्षात ठेवा, अन्यथा अडचणीत होईल वाढ title=

Vastu Tips: वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक वस्तूला महत्त्व आहे. त्यामुळे कोणती वस्तू घरात कोणत्या ठिकाणी असावी याबद्दल सांगितलं आहे. अनेकदा वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. व्यक्ती मृत पावल्यानंतर त्याचा फोटो घरी लावला जातो. मृत व्यक्तींना पूर्वज बोललं जातं. पूर्वजांचा फोटो लावल्याने घर आणि कुटुंबावर आशीर्वाद राहतो असं बोललं जातं. मात्र आशीर्वाद मिळवण्यासाठी पूर्वजांचा फोटो योग्य ठिकाणी लावणं गरजेचं आहे. फोटो चुकीच्या ठिकाणी लावल्यास अडचणीत वाढ होईल, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

घरामध्ये चुकीच्या ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावल्याने घरातील सुख-शांती संपते. तसेच, व्यक्तीला पैसे मिळवण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वास्तुनुसार घरामध्ये पितरांचे फोटो लावण्याचे काही महत्त्वाचे नियम जाणून घेणं गरजेचं आहे.

घरामध्ये पूर्वजांचे फोटो लावताना या गोष्टी लक्षात ठेवा

  1. वास्तू तज्ज्ञांचे मत आहे की पितरांचा फोटो कधीही भिंतीवर टांगू नये. त्यापेक्षा त्यांचा फोटो फ्रेममध्ये लावून कुठेतरी ठेवावा.
  2. बेडरूम, किचन आणि ड्रॉइंग रूममध्ये पूर्वजांचे फोटो लावू नका. जर या ठिकाणी फोटो लावल्यास घरात समस्या वाढू लागतात. तसेच पैशाचे नुकसान होण्याचा धोकाही वाढतो. एवढेच नाही तर पितरांचा अपमान होतो असेही मानले जाते.
  3. घरातील पितरांचा फोटो पूजेच्या ठिकाणी किंवा घरातील देवी-देवतांसोबत फोटो लावू नये. असे केल्याने देवी-देवता नाराज होऊ शकतात आणि तुमच्या जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.
  4. घरात पूर्वजांच्या फोटोसह कधीही आपला फोटो लावू नये. यामुळे घरातील सदस्यांचं आयुर्मान कमी होतं. तसेच घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.
  5. घरातील दक्षिण भिंतीवर पूर्वजांचा फोटो लावणं अशुभ असते. हा फोटो उत्तर दिशेच्या भिंतीवर लावला अडचणी कमी होतात. उत्तर दिशेला पूर्वजांचा फोटो लावल्यास त्यांची नजर दक्षिण दिशेवर राहते. कारण दक्षिण ही दिशा यमाची दिशा मानली जाते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)