Aquarius Horoscope 2024 : कुंभ राशीसाठी कसं असेल आगामी 2024 चं वर्ष? कोणत्या संधी मिळणार? पाहा वार्षिक राशीभविष्य

Aquarius Yearly Horoscope 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 2024 हे वर्ष कुंभ राशीसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.

नेहा चौधरी | Updated: Dec 21, 2023, 02:04 PM IST
Aquarius Horoscope 2024 : कुंभ राशीसाठी कसं असेल आगामी 2024 चं वर्ष? कोणत्या संधी मिळणार? पाहा वार्षिक राशीभविष्य title=
Aquarius yearly horoscope 2024 predictions Kumbh rashi know Makar rashifal in marathi

Kumbh Rashifal Yearly Predictions : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार कुंभ राशीचा स्वामी शनिदेव असून तो न्यायदेवता आहे. 1 जानेवारी 2024 साठी कुंभ राशीच्या संक्रमण कुंडलीतील ग्रहांची स्थिती वर नजर टाकल्यास शनिदेव स्वतः तुमच्या संक्रमण कुंडलीच्या चढत्या घरात विराजमान आहे. तर राहु दुसऱ्या आणि गुरु तिसऱ्या घरात आहे. याशिवाय चंद्र सातव्या घरात, चंद्र आठव्या भावात, बुध आणि शुक्र दहाव्या घरात स्थित आहे. सूर्य आणि मंगळ 11व्या घरात बसले आहेत. कुंभ राशीच्या लोकांसाठी साडेसातीची दुसरी फेरी जानेवारी 2023 पासून सुरू झाली आहे. शनिची दुसरी फेरीतील साडेसाती ही कठीण मानली जाते. पण चंद्र या राशीच्या सातव्या घरात असल्याने 2024 हे वर्ष 2023 पेक्षा अधिक चांगल असणार आहे. (Aquarius yearly horoscope 2024 predictions Kumbh rashi know Makar rashifal in marathi)

कुंभ राशीच्या लोकांचा व्यवसाय 

नोकरदार असो किंवा व्यवसायिक 2024 हे वर्ष तुमच्यासाठी 2023 पेक्षा चांगले असणार आहे. हे वर्ष उत्तम असून सुख समृद्धी घेऊन येणार आहे. 1 मे पासून गुरु ग्रह तुमच्या चौथ्या भावात प्रवेश करणार असल्याने तुम्हाला भौतिक सुख लाभणार आहे. तुमच्या कामात यश प्राप्त होणार आहे. व्यावसायिक एखादं मोठं व्यवहार करणार आहे. मात्र त्यापेक्षा मोठा नफा त्यांना मिळणार आहे.

कुंभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती 2024 

2024 मध्ये तुम्हाला पैशाच्या बाबतीत थोडं सावध राहावं लागणार आहे. कारण राहु ग्रह तुमच्या राशीच्या धनस्थानावर स्थित असणार आहे . त्यामुळे या वर्षी तुम्हाला पैशांची बचत करण्यावर भर देणं हिताचं ठरेल. कारण तुमच्यावर अनावश्यक खर्च ओढवणार आहे. कोणत्याही व्यक्तीला कर्ज चुकूनही देऊ नका. तसंच मोठी गुंतवणूक टाळा. वाहन आणि मालमत्ता खरेदीचे योग आहेत.  

कुंभ राशीच्या लोकांचे करिअर आणि शिक्षण 2024 

2024 हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी खूप चांगले असणार आहे. या वर्षी तुम्हाला परीक्षेत यश मिळणार आहे. तसंच तुम्ही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार आहात. मात्र, शनि राशीत असल्यामुळे काही वेळा तुमचं मन अभ्यासातून विचलित होणार आहे. ज्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. मात्र 2023 च्या तुलनेत तुम्हाला शिक्षण आणि परीक्षांमध्ये अधिक फायदा नवीन वर्षात होणार आहे. 

2024 मध्ये कुंभ राशीचे आरोग्य

आरोग्याच्या दृष्टीने 2024 हे वर्ष तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे. जुन्या आजारातून मुक्ती मिळणार आहे. तसंच शनिदेवाला चढत्या घरात असल्यामुळे तुम्हाला हाडांचे आजार, डोकेदुखी, स्नायू दुखणे, नैराश्य, चिंता इत्यादी समस्यांमधून जावं लागू शकतं. त्यामुळे गाफील राहू चालणार नाही. त्याच वेळी, तुम्ही 15 जानेवारी ते 16 फेब्रुवारी या दरम्यान एप्रलि आणि ऑगस्ट त्याशिवाय 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या काळात आरोग्याची काळजी घ्या. कारण या काळात सूर्य देव तुमच्या संक्रमण कुंडलीच्या आठव्या भावात असणार आहे. 

2024 मध्ये कुंभ राशीचे वैवाहिक जीवन आणि नातेसंबंध

2024 मध्ये प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात सुधारणा होणार आहे. तसंच, वैवाहिक जीवन आणि प्रेम संबंधांमध्ये कोणतीही मोठी समस्या दूरपर्यंत येणार नाही. कारण वर्षाच्या सुरुवातीला चंद्र सप्तम भावात असल्याने गुरूची नजर तुमच्या वैवाहिक जीवनावर असणार आहे. त्यामुळं तुमचं नातं अधिक घट्ट होणार आहे. कधी कधी तणावही जाणवेल. कारण शनिदेवाची दृष्टी तुमच्या सप्तम भावावर असणार आहे. 

कुंभ राशीच्या लोकांसाठी 2024 मध्ये उपाय

2024 मध्र्ये तुम्ही शनि आणि हनुमान चालिसाचे पठण केल्यास फायदा होईल. तसंच शनिदेवाला 5 बदाम आणि काळे तीळ अर्पण करा. वर्षभर विष्णु सहस्त्रनाम पाठ करा. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)