Astro: या 5 वस्तू कधीच कोणाला उधार देऊ नका, नाहीतर... जाणून घ्या

तुम्हाला माहित आहे का की स्वयंपाकघरात 5 गोष्टी आहेत, ज्या एखाद्याला उधार दिल्याने घरात अडचणी येऊ शकतात. तसेच आर्थिक संकटाचा सामनाही करावा लागतो. 

Updated: Sep 22, 2022, 10:42 PM IST
Astro: या 5 वस्तू कधीच कोणाला उधार देऊ नका, नाहीतर... जाणून घ्या title=
प्रातिनिधिक छायाचित्र

Astro Tips For Home: प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी कोणाकडून काही उधार घेतंच असतो. तसेच अडचणीला कोणाला मदत करतोच. शेजारी म्हणजे पहिला नातेवाईक.  अनेकदा शेजाऱ्यांशी खूप जवळचे नातं असतं. दररोज आपण आपल्या शेजाऱ्याशी वस्तूंची देवाणघेवाण करत असतो. या वस्तूंमध्ये साधारणपणे अन्नपदार्थांचा समावेश असतो.  पण तुम्हाला माहित आहे का की स्वयंपाकघरात 5 गोष्टी आहेत, ज्या एखाद्याला उधार दिल्याने घरात अडचणी येऊ शकतात. तसेच आर्थिक संकटाचा सामनाही करावा लागतो. त्या चार गोष्टी काय आहेत माहीत आहे का? (astro tips for home tough times start with lending these 5 things to someone know details)

मीठ  (Salt)

मीठ हा अन्नातील महत्त्वाचा घटक. मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातून मीठ कधीही संपू देऊ नये. तसेच मीठ कोणालाही उधार देऊ नये. मीठ संपणं किंवा मीठ उधार दिल्याने आर्थिक संकट ओढावू शकतं. मीठ देणं महत्त्वाचं असेल तर ते सूर्योदयानंतरच द्यावं.

दूध (Milk)

दुधाचा संबंध चंद्राशी आहे. अंधार पडल्यावर चंद्र पृथ्वीला प्रकाश देतो. त्या वेळी तुम्ही दूध किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तू कुणाला दिल्यास चंद्र रागावतो. यामुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.

कांदा-लसूण  (Onion Ginger)

लसूण-कांदा देणेही टाळावे. लसूण आणि कांद्यावर राहू-केतूचा प्रभाव असतो. सूर्यास्तानंतर लसूण कांदा कोणाकडूनही घेऊ नये तसेच कोणाला उधारही देऊ नये. असं केल्यास माता अन्नपूर्णा रागावतात, असा समज आहे.
 
हळदी (Turmeric)

हळद देखील कोणाला तरी देणं हे कर्ज दिल्यासारखं समजलं जातं. हे देव गुरु बृहस्पती यांच्याशी संबंधित असल्याचे मानलं जातं. सूर्योदयानंतर जर तुम्ही एखाद्याला हळद दिली, तर गंभीर संकटांना सामोरं जावं लागू शकते, जे तुमच्या करिअर, व्यवसाय, नोकरी किंवा वैवाहिक जीवनाशी संबंधित असू शकतात.

Disclaimer: इथे दिलेली माहिती सर्वसाधारण गृहतकांवर आधारित आहे. झी 24 तास याची पुष्टी करत नाही.