Astrology: गुलाब आणि ज्योतिशविद्या यांचा संबंध काय? वाचून नि:शब्द व्हाल

मंगळवारी भगवान शिवाला (lord shiva) 11 गुलाबाची फुल अर्पण केल्याने कुंडलीतील मांगलिक दोष (manglik dposh nivaran) दूर होतो अस म्हटलं जात . 

Updated: Nov 26, 2022, 03:21 PM IST
Astrology: गुलाब आणि ज्योतिशविद्या यांचा संबंध काय? वाचून नि:शब्द व्हाल  title=

Astrology: ज्योतिष आणि वास्तूशास्त्रामध्ये काही गोष्टी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. यातलीच एक गोष्ट म्हणजे फुलं. तुम्हाला माहितीये का, प्रत्येक देवतेला प्रसन्न करण्यासाठी त्यांना ठराविक फुलं वाहिली जातात. ज्योतिषविद्येमध्येच यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. गुलाबाच्या फुलाचंही या विद्येमध्ये अनन्यसाधारण महत्त्वं आहे. तुम्ही म्हणाल हे फूल काय बरं इतकी किमया करतं, की त्याला इतकं महत्त्वं दिलं जातंय?  (astrology and flower connection)

ज्योतिषविद्येमध्ये गुलाबाला अनन्यसाधारण महत्त्व (rose importance in astrology)

देवाची पूजा करताना फुलांचा वापर केलाच जातो. किंबहुना विष्णू आणि लक्ष्मीदेवीला हे फूल आवर्जुन वाहिलं जातं. असं म्हणतात की, गुलाबाचं रोपटं घरात लावल्याससुद्धा घरात असणारे नातेसंबंध आणखी दृढ होतात. गुलबाच्या सुवासाचा सम्बन्ध शुक्र ग्रह आणि लाल गुलाबचा सम्बन्ध मंगळ ग्रहासोबत जोडला जातो.. असं म्हणतात कि, देवी लक्ष्मीच्या पूजेत नेहमी गुलाबाचा वापर केल्यास घरात कधीच आर्थिक छानछान भासत नाही असं म्हटलं जात...  (financial growth in house)

गुलाबाबा फुलाचा वास्तुशास्त्रात महत्व ( Rose Flower in Vastu Shastra)

वास्तुशास्त्रानुसार गुलाबाचं झाड घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावं. धनाची देवी माता लक्ष्मीला गुलाबाचं फुल प्रचंड आवडत. (goddess luxmi love rose flower) गुलाबाच्या फुलांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा (positive energy) टिकून राहते  ज्यामुळे घरात नेहमी सुख शांती नांदते. कुटुंबातील सर्वजण एकत्र आनंदाने राहतात. 

आणखी वाचा: cooking tips: हात खराब न करता चपातीसाठी अशी मळा परफेक्ट कणिक

गुलाबाच्या फुलाचे वास्तुशास्त्रात महत्व  (Remedy of Rose Flower)

ज्योतिष शास्त्र आणि माहितीनुसार 11 मंगळवार हनुमानाला (lord hanuman) ताज्या गुलाबाच्या फुलांचं अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.. त्याचसोबत मंगळवारी भगवान शिवाला (lord shiva) 11 गुलाबाची फुल अर्पण केल्याने कुंडलीतील मांगलिक दोष (manglik dposh nivaran) दूर होतो अस म्हटलं जात . 

(टीप : वरील माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे zee२४ तास याची खातरजमा करत नाही...  )

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x