Baba Vanga Prediction : नव्या वर्षाची सुरुवात होत नाही, तोच त्या वर्षाविषयीची अनेक भाकितं सध्या कानावर येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये पृथ्वीचा (Disaster on earth ) सर्वनाश होणार इथपासून ते अगदी मानवी आयुष्य कशा पद्धतीनं धोक्यात येणार इशपर्यंतच्या गोष्टी समोर आल्या. यापैकी बहुतांश भाकितांमागे एका व्यक्तीचं नाव पुढे येताना दिसत आहे. ते नाव म्हणजे बाबा वेंगा. मुळचे बल्गेरियाचे असणारे बाबा वेंगा नेत्रहीन होते. (Bulgeria) बल्गेरियातीलच कोझुह पर्वतरांगांमधील रुपाईट क्षेत्रामध्ये त्यांनी आयुष्यातील बहुतांश काळ व्यतीत केला. (Baba Vanga Prediction for upcoming year 2023 )
बल्गेरियाच्या याच बाबा वेंगा यांनी 2023 (New year 2023) हे वर्ष नेमकं कसं असेल याविषयी बरीच भाकितं केली आहे. त्यांच्यामते येणारं वर्ष अंधकारमय असेल. सोबतच पृथ्वीच्या कक्षेत बदल झाल्यामुळं अण्वस्त्र हल्ल्यांमागचं ते मुख्य कारण ठरणार आहे. इतकंच नव्हे, तर या वर्षात बाबा वेंगा यांनी युद्ध, त्सुनामी आणि उष्णतेची महाभयंकर लाट येणार असल्याचंही सांगितलं.
इतकंच नव्हे, तर येणाऱ्या काळात नैसर्गितरित्या बाळाचा जन्म होण्याची प्रक्रिया आता मागे पडणार असून, प्रयोगशाळेत ही प्रक्रिया पार पडणार आहे. इतकंच नव्हे, तर त्या मुलांच्या त्वचेचा रंग, त्यांचे शारीरिक गुणधर्मसुद्धा पालक ठरवतील असं बाबा वेंगा यांनी त्यांच्या निरीक्षणातून सांगितलं होतं.
येणाऱ्या वर्षात विध्वंसाचं प्रमाण मोठं असेल असं सांगताना, पृथ्वीवर कोणा एका ग्रहावरून आलेल्या शक्तीचा हल्ला होईल असंही सांगत यामध्ये लाखोंचा मृत्यू ओढावेल असा इशारा बाबा वेंगा यांनी दिला. अभ्यासकांच्या मते हा एलियन हल्ला असू शकतो, ज्यामध्ये प्रचंड हानी होऊ शकते. इतकंच नव्हे, तर वीद्युत केंद्रांमध्ये महाभयंकर स्फोट होऊन त्यामुळं संपूर्ण जगावर विषारी ढगांचं सावट घोंगावेल असंही भाकीत बाबा वेंगा यांनी केलं आहे.
बाबा वेंगा यांची ही धडकी भरवणारी भाकीतं पाहता, येणारं वर्ष जर खरंच इतक्या संकटांनी भरलेलं असेल, तर हे नवं वर्ष नको रे बाबा! अशीच प्रतिक्रिया अनेकजण देत आहेत.
नेत्रहीन असुनही बाबा वेंगा यांची दृष्टी खूप काही पाहू शकत होती असं अनेकांचं म्हणणं. 3 ऑक्टोबर 1911 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. वांगेलिया पांडेवा गुशतरोवा हे त्यांचं खरं नाव असलं, तरीही त्यांना संपूर्ण जग बाबा वेंगा याच नावाने ओळखले जात होते. 9/11 दहशतवादी हल्ल्याविषयी त्यांनी केलेलं भाकित खरं ठरलं होतं. ब्रेक्सिटसोबतच त्यांचे इतरही अनेक अंदाज खरे ठरले होते. ज्यामुळं त्याच्या नावाची जगभरात चर्चा झाली.