Budh Gochar 2023 : सोमवारी 'या' लोकांचं नशीब पलटणार, बुध देणार बंपर पैसा आणि घवघवीत यश

Mercury Transit 2023 :  ग्रहांच्या गोचरमुळे आपल्या आयुष्यावर (Astrology today) परिणाम होतो. कुंडलीतील ग्रह कुठल्या घरात आहे यावर त्याचं आरोग्य, नोकरी, आर्थिक स्थिती, सुख आणि संकट अशा अनेक गोष्टी ठरल्या जातात. अगदी विवाह योग देखील यातून सांगितला जातो. सोमवारी (Horoscope monday 27 february) बुध ग्रहाच गोचर होणार आहे. याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे. 

Updated: Feb 26, 2023, 11:50 AM IST
Budh Gochar 2023 : सोमवारी 'या' लोकांचं नशीब पलटणार, बुध देणार बंपर पैसा आणि घवघवीत यश title=
Budh Gochar 2023 Mercury Transit 2023 on 27 february 2023 monday these zodiac signs Mercury will give money and success in marathi

Budh Gochar 2023 in marathi :  ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology Today In marathi) बुध हा ग्रहांचा राजकुमार आहे. सोमवारी 27 फेब्रुवारीला बुध गोचर (Mercury Transit 2023) होणार आहे. बुध ग्रह हा कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे याचा शुभ आणि अशुभ परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे. बुध हा पैसा, व्यवसाय, बुद्धिमत्ताचा कारक आहे. त्यामुळे जेव्हा बुध हा कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत तर काही राशींचे भाग्य उजळणार आहे. सोमवारपासून अचानक त्यांना धनलाभ होणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. कुंभ राशीत आधीपासून सूर्य असल्याने सोमवारी सूर्य, कुंभ आणि बुध यांचा संयोग होणार आहे. त्यामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. (Budh Gochar 2023 Mercury Transit 2023 on 27 february 2023 monday these zodiac signsMercury will give bumper money and quick success in marathi)

मेष (Aries)

बुधादित्य राजयोग हा या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. नोकरदार वर्गाची सॅलरी वाढणार आहे आणि प्रमोशनही होणार आहे. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर तुम्हाला परत मिळणार आहेत. बुधादित्य राजयोग हा काळ या राशीच्या लोकांसाठी एकंदरीतच खूप फायदेशीर ठरणार आहे. 

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांना बुध गोचर हा आर्थिक लाभ होणार आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ यशाचा असणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होणार आहे. विवाह इच्छुकांचं लग्न ठरणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर जबाबदारी वाढणार आहे. एकदंरीत हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर आणि आनंदाचा ठरणार आहे. 

तूळ (Libra)

बुधादित्य योग हा तूळ राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा मेहनतीचं फळ मिळणार आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळणार आहे. नवीन व्यवसायाची संधी चालून येणार आहे. विवाह इच्छुकांना आवडता जीवनसाथी मिळणार आहे. 

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांसाठी हा काळ यशाची पायरी असणार आहे. समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे. तुमच्या कामाचं समाजात कौतुक होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी यश आणि आनंद घेऊन येणार आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)