मुंबई : मकर राशीमध्ये बुध आणि शनी ग्रह राहणार आहे. ही स्थिती 4 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. याचा परिणाम 12 राशींवर कसा होणार? कोणत्या राशीसाठी पुढचे 20 दिवस अधिक कठीण असणार आणि कोणत्या राशीवर चांगला परिणाम होणार हे जाणून घेऊया.
मेष : करियरमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायातील गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल.
वृषभ : मन प्रसन्न राहील. नोकरीच्या संदर्भात परदेशातून संधी मिळेल. बुधाचा राशी बदल या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरेल.
मिथुन : भौतिक सुख मिळेल. व्यवसाय किंवा करिअरच्या नियोजनात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल.मानसिक दबाव जाणवू शकतो.
कर्क : जुने वाद पुन्हा अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. खर्चात मोठी वाढ होऊ शकते. करिअरमध्ये काही अडचणी येऊ शकतात.
सिंह : कुटुंबात गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. नात्यांमध्ये गोडवा आणण्यासाठी हा काळ फार उत्तम आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. बोलताना शब्द जपून वापरा.
कन्या : जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक समस्यांबाबत सावधगिरी बाळगा.
तुळ : घरगुती कामात उधळपट्टी वाढेल. घरातील बांधकामाची कामे पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद राहील.
वृश्चिक : प्रवासात नुकसान होऊ शकते. त्यामुळे काळजीपूर्वक प्रवास करा. याशिवाय आवश्यक कागदपत्रांची काळजी घ्यावी लागेल. हा काळ धोक्याचा आहे त्यामुळे या काळात आपलं नुकसान कसं होणार नाही याची काळजी घ्या.
धनु : आर्थिक मुद्द्यांवर सावधगिरी बाळगणे योग्य राहील. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. नोकरीत आर्थिक प्रगती होईल. रागावर नियंत्रण ठेवा.
मकर : स्वत: ची काळजी घेणे आवश्यक आहे. राग आणि चिडचिड होणार नाही याची काळजी घ्या. काहीतरी मोठी घटना तुमच्या आयुष्यात घडण्याची शक्यता आहे.
कुंभ : पैशाच्या व्यवहारात सावध राहावे लागेल. आर्थिक नुकसानीचे योग आहेत. व्यवसायिकांना मोठा फायदा याच काळात होण्याची शक्यता आहे.
मीन : चुकीच्या निर्णयामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. शिक्षणात काही अडथळे येऊ शकतात.