Budhaditya rajyog : तूळ राशीत बनला बुधादित्य राजयोग; 'या' राशींना मालामाल होण्याची संधी

Budhaditya rajyog 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि बुध यांनी मिळून तूळ राशीमध्ये बुधादित्य राजयोग तयार केलाय. या राजयोगामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 3 राशींना याचा लाभ मिळणार आहे.

सुरभि जगदीश | Updated: Oct 30, 2023, 09:05 AM IST
Budhaditya rajyog : तूळ राशीत बनला बुधादित्य राजयोग; 'या' राशींना मालामाल होण्याची संधी title=

Budhaditya rajyog 2023 : ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि ग्रहांमुळे तयार होणारे राजयोग यांना खूप महत्त्व मानलं जातं. ज्यावेळी एखादा ग्रह ठराविक काळाच्या अंतराने आपली राशी बदलतो आणि दोन ग्रह एका राशीत येतात तेव्हा ग्रहांचा संयोग आणि राजयोगही तयार होतो. असाच सूर्य आणि बुध ग्रहाने खास राजयोग तयार केला आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि बुध यांनी मिळून तूळ राशीमध्ये बुधादित्य राजयोग तयार केलाय. या राजयोगामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 3 राशींना याचा लाभ मिळणार आहे. सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने तयार झालेला बुधादित्य राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. असं म्हणतात की, ज्या राशींमध्ये बुद्धादित्य राजयोग तयार होतो, त्या लोकांचे भाग्य खुलते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.

पाहूयात बुधादित्य राजयोगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे. 

मिथुन रास

सूर्य आणि बुधाचा संयोग आणि बुधादित्य राजयोगाची निर्मिती या राशींच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकते. करिअर आणि व्यवसायासाठी अनुकूल राहील. करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायासाठी तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते. अविवाहित लोकांसाठी वैवाहिक प्रस्ताव येऊ शकतात. बुधादित्य राजयोगाच्या प्रभावामुळे तुम्ही नवीन कार खरेदी करू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

धनु रास

बुध आणि सूर्य यांचा संयोग धनु राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न वाढणार आहे. नवीन योजना करण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा सुवर्णकाळ असणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे.

सिंह रास

बुधादित्य राजयोग लोकांसाठी भाग्यवान सिद्ध होणार आहे. ६ नोव्हेंबरपर्यंतचा काळ या राशींसाठी शुभ असणार आहे. तुम्ही गुंतवणूक करू शकता, तुम्ही सतत नफा मिळवू शकता. यावेळी आर्थिक बाजू मजबूत राहणार आहे. करिअरमध्ये विशेष लाभ होणार आहे. नोकरदार लोकांना नवीन संधी मिळतील आणि काही नवीन जबाबदारी मिळू शकेल. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )