करोडपती व्हायचंय? तर मग फक्त 3 बुधवार करा हे उपाय

कुंडलीत बुध मजबूत असेल तर सगळं काही ठीक होते आणि तो कमजोर असेल तर सुख पाठ फिरवते. 

Updated: May 4, 2022, 01:07 PM IST
करोडपती व्हायचंय? तर मग फक्त 3 बुधवार करा हे उपाय title=

मुंबई : हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे. बुद्धी देवतेचा वार म्हणून बुधवारला महत्व आहे. बुध हा बुद्धिमत्ता, एकाग्रता, वाणी, त्वचा, सौंदर्य आणि सुगंध यांचाही कारक आहे. बुद्धीची देवता श्री गणेश आहेत. त्यामुळे बुधवारी श्री गणेश उपासना करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते.

बुधाला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. कन्या आणि मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. कुंडलीत बुध मजबूत असेल तर सगळं काही ठीक होते आणि तो कमजोर असेल तर सुख पाठ फिरवते. त्यामुळे बुध प्रसन्न होण्यासाठी बुधवारी श्री गणेशाची पूजा करावी.

श्री गणेश यांची उपासना केल्यास शुभ फायदे होतात. सर्व त्रास नाहीसे होतात. जीवनात काही समस्या असतील तर बुधवारी हे उपाय करावेत यामुळे सुख समृद्धी आणि संपत्तीचे तुमच्या घरी आगमन होईल.

या उपाययोजनामुळे रोग, दोष व दारिद्र्य नष्ट होतील. 

बुधवारी गणेशाची पूजा करताना गुलाल अर्पण करावा. श्री गणेशाला गुलाल अर्पण केल्यामुळे सर्व समस्या संपतात. ज्या कार्याचा प्रारंभ करू त्यात यश मिळते. गणपतीला दुर्वा खूप प्रिय आहे. दुर्वा अर्पण केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते. किमान 21 दुर्वा अर्पण कराव्या. यानंतर नैवेद्य दाखवावा. सलग 5 बुधवार ही पूजा केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल.

बुधवारी गणेश रुद्राक्ष धारण केल्यास चांगले परिणाम मिळतात. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी ते दुधात घालून मंदिरात ठेवा. त्याची यथायोग्य पूजा करून नंतर ते धारण करा. रुद्राक्ष धारण केल्याने प्रत्येक अडथळा दूर होतो.

बुधदोष पीडित व्यक्तीने दुर्गा देवीची पूजा करावी. ‘ओम ह्रीं क्लीं चामुंडयै विचार’ या मंत्राचा दररोज 5, 7, 11, 21 किंवा 108 वेळा जप केल्याने बुद्ध दोष नाहीसा होतो. 

बुधवारी हिरव्या भाज्या, डाळी, हिरवे कपडे अशा वस्तू गरिबांना दान करा. हिरव्या वस्तू दान केल्याने पैशा संबंधित समस्या संपतात.

बुध कमजोर असेल तर नेहमी हिरवा रुमाल सोबत ठेवा.

बुध ग्रहाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला लाल ध्वज लावावा.

बुधवारी गायीला हिरवे गवत खाऊ घातल्याने देवाचा आशीर्वाद मिळून सर्व गोष्टी प्राप्त होतात. 

बुध देवाची पूजा सलग तीन बुधवारी पूजा केल्यास शक्ती, संपत्ती आणि आनंद प्राप्त होतो. 

बुधवारी हे काम करू नका

बुधवारी पान खरेदी किंवा सेवन करू नये, तसेच सुपारी घेऊन घरात येऊ नये. या गोष्टी जीवनात दारिद्र्य आणतात. म्हणून सुपारीची पाने या दिवशी खरेदी करू नये. 

बुधवारी चुकूनही कोणत्याही किन्नरचा अपमान करु नये. या दिवशी किन्नरांना दान करावे. किन्नरांचा अपमान केल्याने माता लक्ष्मी चिडतात.

महिला आणि मुलांचा अपमान करणे टाळणे. त्यांच्याविरूद्ध काहीही चुकीचे बोलू नये. या दिवशी शक्य आपल्यापेक्षा मोठ्या महिलांच्या पाया पडावे तर लहान मुलीला भेटवस्तू द्यावी.