Champa Shashti 2022 : येळकोट यळकोट जय मल्हार...; 'चंपाषष्ठी'चं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का?

येळकोट यळकोट जय मल्हार...; मार्गशीष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी देव-दिपावली साजरी करुन चंपाषष्ठीपर्यंत खंडोबाचा नवरात्र सण साजरा केला जातो. आज आहे चंपाषष्ठी...  

Updated: Nov 29, 2022, 09:06 AM IST
 Champa Shashti 2022 : येळकोट यळकोट जय मल्हार...; 'चंपाषष्ठी'चं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का? title=

Champa Shashti 2022 : महाराष्ट्रातील बहुतांश लोकांचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाची षड् रात्रोत्सवला सुरुवात झाली आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत षड् रात्रोत्सव असतो. षड् रात्रोत्सव उत्सव म्हणजे खंडोबाचे नवरात्र उत्सव. मार्गशीष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी देव-दिपावली साजरी करुन चंपाषष्ठीपर्यंत खंडोबाचा नवरात्र सण साजरा केला जातो. आज आहे (champa shashti in 2022) चंपाषष्ठी... आज जेजूरीमध्ये उत्साहचं वातावरण आहे. असंख्य भक्तजण आज खंडोबाच्या दर्शनासाठी जेजूरीला जातील. 

चंपाषष्ठीला काय करतात? 

चंपाषष्ठीला घरोघरी तळी भरतो. तळी भरणं हा एक कुळाचार आहे. मंदिरात सकाळी 4 वाजेपासून तळी उचलतात. त्या तळीमध्ये 5 बाजरीच्या भाकरींचा नैवैद्य ठेवला जातो. त्यानंतर पुरुष 'येळकोट यळकोट जय मल्हार' म्हणत पाच वेळा ती तळी उचलतात. त्यानंतर भाकरींचं नैवेद्य (champa shashti naivedya) प्रसाद म्हणून प्रत्येकाला खायला देतात. या सहा दिवसांत खंडोबाची मनोभावे पूजा केली जाते. (champa shashti mantra)

का साजरी करतात चंपाषष्ठी?

खंडोबा फक्त महाराष्ट्रातील कुल दैवत नसून कर्नाटकमध्ये (champa shashti 2022 karnataka) अनेकांचे कुलदैवत आहेत. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला चंपाचष्ठी असं म्हणतात. जेजूरीत हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेवून मणी आणि मल्ल दैत्यांचा वध केला. 

मार्तंड मल्हारी महादेवाचा अवतार होता असं सांगण्यात येतं. कृत युगात ब्रह्मदेवाने मल्ल आणि मणी यांना तुमचं वध कोणीही करु शकत नाही... असं वरदान दिलं होतं. ब्रह्मदेवाने दिलेलं वरदान प्राप्त करुन मल्ल आणि मणी सामान्य जणतेला त्रास देवू लागले. 

लोकांचे होत असलेले हाल पाहून ऋषीमुणींनी देवाकडे मदत मागितली. तेव्हा शंकरांनी मार्तंड भैरवाचं रुप घेवून आपले सात कोटी म्हणजेच येळकोट सैन्य घेवून राक्षसांवर हल्ला केला. मार्तंड भैरवांनी मल्ल आणि मणी यांची छाती फोडून त्यांचा अंत केला. त्यानंतर मल्ल आणि मणी यांनी क्षरण येवून माझ्य मस्तकाला तुझ्या पायाशी मला स्थान दे... माझे अश्वारुढ रुप देखील तुझ्या शेजारी रहावी अशी इच्छ व्यक्त केली. 

मल्ल आणि मणी यांची इच्छा ऐकल्यानंतर भगवान शंकरांनी त्यांना तथास्तु म्हटलं. त्यानंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा पराभव केला तेव्हा त्यांनी क्षरण जावून तुमच्या नावा आधी माझं नाव जोडलं जावे अशी मागणी केली. त्यानंतर शंकरांनी तथास्तू म्हटलं. (champa shashti in marathi)

म्हणून मार्तंड भैरवांनी ते देखील मान्य केलं. म्हणून तेव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असं म्हटलं जातं. या दिवशी वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. या दिवशी वांग्याचं भरीत आणि भाकरी यांचं नैवद्य देवाला दाखवतात. तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून अर्पण केलं जातं. (champa shashti 2022 date)