Chanakya Quotes : आपण चाणक्य नितिबाबत ऐकत आलो आहोत. पण आचार्य चाणक्य बद्दल कोणाला काहीच माहीत नाही. अनेक लोक लहानपणापासून चाणक्य नितिच्या कथा वाचून आणि ऐकून मोठे झाले आहेत. आचार्य हे भारताचे प्रमुख मुत्सद्दी मानले जातात. राजकारणात त्यांची चांगली पकड होती. यामुळेच त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीने कधीही मागे वळून पाहिलेले नाही. त्यांनी सतत यशाची शिडी चढली आहे. आचार्य चाणक्य यांची धोरणे आजही अत्यंत प्रभावी मानली जातात.
आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी खऱ्या होताना दिसत आहेत. त्यांनी मानवी जीवनात अशा काही गोष्टी आणि रहस्ये सांगितली आहेत की, ती रहस्ये कोणालाही सांगू नयेत. जर तुम्ही तुमची रहस्ये कोणाला सांगितली तर तुम्ही स्वतःचे नुकसान करु शकता.
वैवाहिक जीवनात अनेक गोष्टी घडतात. कधी पती-पत्नी प्रेमात भांडण होते. तर कधी दोघांमध्ये वाद विकोपाला जातात. पती-पत्नीमधील परस्पर बोलणे कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला सांगू नये. या गोष्टी वैयक्तिक आहेत आणि जेव्हा इतर व्यक्तींना कळते तेव्हा तो त्याचा फायदा घेऊ शकतो. त्यामुळे तुमचे नुकसान होण्याचा जास्त धोका असतो. 'बुध' राशीत 'या' दोन ग्रहांची युती; छप्परफाड धनवर्षाव, 7 पिढ्या बसून खाल एवढा मिळेल पैसा
आचार्य चाणक्य म्हणायचे की जर गुरुने एखाद्या व्यक्तीला काही विशेष मंत्र किंवा ज्ञान दिले असेल तर त्याने ही गोष्ट गुप्त ठेवावी. ते कोणाशीही शेअर करु नये, कारण अडचणीच्या वेळी ते त्याला उपयोगी ठरु शकते. दान करणे हे पुण्य आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु जर एखाद्या व्यक्तीने गुप्त दान केले तर त्याने चुकूनही कोणालाही सांगू नये.
आपण आपले खरे वय कोणालाही सांगू नये. असे केल्याने तुम्ही इतरांच्या तुलनेत स्वत:ला तरुण आणि निरोगी ठेवू शकता आणि तुमच्या कमकुवतपणाचा कोणीही गैर फायदा घेऊ शकत नाही. काही कारणं किंवा औषधे अशी आहेत, जी लपवून ठेवली पाहिजेत. कारण ही औषधे प्रकाश आणि हवेच्या संपर्कात आल्यानंतर परिणामकारक राहत नाहीत. त्यामुळे तुमची वैयक्तिक कारणं आणि गोष्टी कोणासोबत शेअर करु नका.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)