Chanakya Niti: बायको असतानाही दुसऱ्या महिलेकडे का आकर्षित होतात पुरुष; 'ही' आहेत कारणं

चाणक्याची नीतिशास्त्राची (Chanakya Niti) ही तत्त्वे समर्पक असतात. अशा परिस्थितीमध्ये चाणक्याने पती-पत्नीच्या नातेसंबंधावर (Husband and wife) आपली तत्त्वंही दिलीयेत. ही तत्त्व जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

Updated: Dec 25, 2022, 08:10 PM IST
Chanakya Niti: बायको असतानाही दुसऱ्या महिलेकडे का आकर्षित होतात पुरुष; 'ही' आहेत कारणं title=

Chanakya Niti: चाणक्याची नीतिशास्त्राची (Chanakya Niti) ही तत्त्वे समर्पक असतात. अशा परिस्थितीमध्ये चाणक्याने पती-पत्नीच्या नातेसंबंधावर (Husband and wife) आपली तत्त्वंही दिलीयेत. ही तत्त्व जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. असं म्हटलं जातं की, दुसऱ्या व्यक्तीसाठी आकर्षण, मग ती स्त्री असो किंवा पुरुष, ही एक सामान्य गोष्ट आहे. हे चुकीचंही नाही, मात्र ज्यावेळी हे आकर्षण एखाद्याची स्तुती करणं किंवा बोलण्याच्या पलीकडे जातं त्यावेळी ते चुकीचं असतं.

सामान्य सिद्धांत सांगतो की, आकर्षण मनुष्याच्या आतील एक स्वभाव आहे. मात्र यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होत असेल तर हे आकर्षण नाही. अशामध्ये विवाहित लोकांचं  एक्स्ट्रा-मॅरिटल अफेअर (Extramarital sex) वेगळ्या कारणांमुळे होतं. जर याला वेळीच आळा घातला तर परिस्थिती हाताबाहेर जात नाही. अशा स्थितीत आम्ही अशाच पाच कारणांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामुळे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं.

कमी वयात लग्न

कमी वयात लग्न झाल्याने या अशा समस्या येऊ शकतात. अनेकदा याकडे दुर्लक्ष करता येत नाही. अशा परिस्थितीत ज्यावेळी व्यक्तीचं करिअर चांगले असतं, तेव्हा त्यांना वाटतं की, अनेक गोष्टी मागे राहिल्या आहेत. या गोष्टी त्यांना साध्य करायच्या होत्या. अशावेळी मग लोक विवाहबाह्य संबंधांचा विचार करू लागतात. 

शारीरिक सुख

शारीरिक सुख न मिळाल्यामुळे बहुतेकदा पती-पत्नीमध्ये असणार आकर्षण कमी झाल्याचं दिसून येतं. अशामध्ये अनेकदा लोकं एक्स्ट्रा-मॅरिटल अफेअरकडे वळतात. शारीरिक सुख म्हणजे केवळ बेडवर एकमेकांना संतुष्ट करणं नव्हे तर मनाने आणि बोलण्यातून एकमेकांबद्दल उदार असणं असतं.

भ्रमनिरास होणं

अनेकदा तुम्ही तुमच्या पार्टनरला सर्वात सुंदर मानून काळजी घेता. अशावेळी तुमची लाईफ पार्टनर कुरूप दिसली तर तुमच्या आयुष्यात काहीही चांगलं होणार नाही असा तुमचा समज होतो. त्यावेळी जोडीदाराचे सर्व गुण आणि अवगुण दिसू लागतात. अशावेळी संवादाची परिस्थिती निर्माण होऊन विचित्र पाऊल उचललं जातं.

मूल होणं

पुरुष किंवा स्त्री पालक झाल्यानंतर त्यांची प्रायोरिटी बदलतात. त्याच्या आयुष्यात मोठा बदल होतो. अशा परिस्थितीत पुरूषांचा त्यांच्या पार्टनरबद्दल भ्रमनिरास होतो. महिला त्यांच्या मुलांसोबत जास्त वेळ घालवतात, हे त्यामागील कारण असतं.