मुंबई: खगोलतज्ज्ञ आणि खगोलप्रेमींसाठी ग्रहण म्हणजे पर्वणी असते. ग्राहण पाहण्याची उत्सुकता एक वेगळीच असते. मात्र आपल्याकडे अनेक काळापासून ग्रहणा दरम्यान काय करावं काय करू नये याची एक परंपरा पाळली जाते. आंतराळात होणाऱ्या ग्रहणाचे परिणाम आपल्या कुंडलीतील ग्रहांवरही होत असतो असं म्हटलं जातं. यावर्षीचं दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.
जसा सूर्य ग्रहणाचा 12 राशींवर प्रभाव पडत असतो तसाच प्रभाव चंद्र ग्रहणाचाही पडत असतो. काही राशींसाठी हे ग्रहण फायदा मिळवून देणारं तर काही राशींना सावध राहण्याचा इशारा असतो. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या ग्रहणाचा परिणाम राशींवर काय होणार आहे ते जाणून घेऊया.
ग्रहण कधी आणि कुठे?
19 नोव्हेंबर बुधवारी दुपारी 11 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण संध्याकाळी 5 वाजून 33 मिनिटांनी सुरू होणार आहे. हे चंद्र ग्रहण भारतातून दिसणार नाही. ज्योतीष शास्त्रानुसार या ग्रहणाचा परिणाम थेट माणसाच्या कुंडलीवर होणार आहे. ग्रहण कालावधीमध्ये गोष्टी नजरेआड केल्या तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असंही काही वेळा सांगितलं जातं.
नोव्हेंबर महिन्यात होणारं हे ग्रहण वर्षातील दुसरं आणि शेवटचं असणार आहे. यामध्ये सूतक काळ असतो असं मानलं जातं. शास्त्रानुसार उपछाया ग्रहण असंही म्हटलं जातं. हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे भारतात सूतक काळ पाळण्यात येणार नाही असंही सांगितलं जात आहे. सूतक काळ चंद्र ग्रहणापूर्वी 9 तास आधी सुरू होईल. यावेळी कोणतंही शुभकार्य केलं जात नाही.
या चंद्र ग्रहणाचा 2 राशींवर मोठा प्रभाव पडणार आहे. या राशींना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या राशीच्या व्यक्तींनी शक्यतो ग्रहण काळात गोष्ट पाळणं गरजेचं आहे. या दिवशी केतू ग्रह वृश्चिक राशीमध्ये विराजमान होणार आहे. त्यामुळे गैरकामं किंवा गैरव्यवहार करू नका. वाईट गोष्टी न अकडणंच फायद्याचं ठरेल. ग्रहण काळात व्यसन करू नका. वाईट संगतीचा परिणाम घातक ठरणार आहे. गुंतवणूक करू नका इतकच नाही तर कोणत्याही वाईट गोष्टीत अडकणार नाही याची काळजी घ्या.
वृषभ राशीसाठी चंद्र ग्रहण धोकादायक ठरू शकतं. आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. वाहन चालवत असताना या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी. वाद-विवादापासून दूर राहावं. तसंच नुकसान होण्याची शक्यता असल्यानं ती पचवण्याची तयारी या राशीच्या व्यक्तींनी करायला हवी. किंवा ते टाळता येत असेल तर तसे प्रयत्न करायला हवेत.
(महत्त्वाची सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य संदर्भांवर आधारित आहे. Zee 24 तास या माहितीची कोणतीही खातरजमा करत नाही)