Chaturgrahi Yog 2023 October in Tula: यंदाचे नवरात्री अतिशय खास असणार आहे. नवरात्री काळात ग्रह गोचरमुळे तूळ राशीत चार ग्रहांचं मिलन होणार आहे. प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर संक्रमण करतो. त्यामुळे काही शुभ तर कधी अशुभ असे योग तयार होत असतात. 15 ऑक्टोबरपासून नवरात्री (Navratri 2023) उत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रीमध्ये सूर्यदेव आपली रास बदलणार आहे. 18 ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत (Surya Gochar 2023 ) प्रवेश करणार आहे. तूळ राशीत आधीपासून बुध, मंगळ आणि केतू विराजमान आहे. त्यामुळे तूळ राशीत ग्रहांचा मेळा असणार आहे. तूळ राशीत सूर्य, बुध, मंगळ आणि केतू यांच्या मिलनातून चतुर्ग्रही योग निर्माण होतो आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, हा योग सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव पडणार आहे. ज्योतिषशास्त्रात चतुर्ग्रही योग अत्यंत शुभ आणि विशेष मानला जातो. हा योग 3 राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. (chaturgrahi yog in libra october 2023 at Navratri 2023 will make these zodiac signs rich they will get alot of benefits)
तूळ राशीत तयार होत असलेला चतुर्ग्रही योग मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यशाली ठरणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. त्यामुळे तुमचं बँक बॅलेन्स वाढणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. करिअरमध्ये प्रगती होणार आहे. समाजात मान-सन्मान वाढणार आहे.
कन्या राशीच्या लोकांना चतुर्ग्रही योगातून मोठा आर्थिक लाभ घेऊन येणार आहे . उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहेत.. व्यवसायात प्रगती होणार आहे. मान-सन्मानात वाढ होणार आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरणार आहे. धैर्य आणि शौर्य वाढ होणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे मार्ग लागणार असून उत्पन्नात वाढ होणार आहे.
मकर राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग शुभ ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित आणि सकारात्मक परिणाम दिसू येतील. व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे. कोणतीही इच्छा या काळात पूर्ण होणार आहे. काही नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा योग काळ आहे. आर्थिक लाभ झाल्यामुळे घरात आनंदाचं वातावरण असणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)