राशीभविष्य २१ फेब्रुवारी : 'या' राशींच्या व्यक्तींना लाभदायी ठरणार यंदाची महाशिवरात्र

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस 

Updated: Feb 21, 2020, 08:05 AM IST
राशीभविष्य २१ फेब्रुवारी : 'या' राशींच्या व्यक्तींना लाभदायी ठरणार यंदाची महाशिवरात्र
संग्रहित छायाचित्र

मेष- बेरोजगारांना आज रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी आहेत. व्यवसायावर लक्ष द्या. समाजात आज तुम्हाला आदर मिळेल. कौटुंबीक नातेसंबंध सुधारतील. खर्च वाढेल. 

वृषभ- नोकरीच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढलेला असेल. काही व्यक्ती तुमच्याकडून त्यांची कामं करवून घेतील सावध राहा. मानसिक तणाव असेल. 

मिथुन- व्यवसाय आणि नोकरीच्या ठिकाणी कुटुंबाचं सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी विचारपुर्वक वर्तणूक ठेवा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. तुमच्या भावनांचा आदर केला जाईल. 

कर्क- नव्या व्यवसायाकडे तुमचं लक्ष वेधलं जाईल. नोकरीमध्ये काही बदल होतील. अर्थार्जनात वाढ होईल. व्यवहार कौशल्यामुळे वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. जुने आजार दूर जातील.

सिंह- व्यापासात नवी सुरुवात कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीच्या निमित्ताने एखादा प्रवासयोग संभवतो. अविवाहितांसाठी आजचा दिवस चांगला आहे. 

कन्या- नोकरी आणि व्यवसायामध्ये भावनांच्या बळावर कोणताही निर्णय घेऊ नका. एखादा जुना वाद समोर येईल. वाहनाचा उपयोग सावधगिरीने करा. कौटुंबीक समस्या वाढतील. 

तुळ- कर्जमुक्त व्हाल. स्वत:च्या कामांवर  लक्ष ठेवा. अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. जमीन, संपत्तीचे वाद मिटतील. एखादं नवं आणि तितकंच सकारात्मक काम कराल. 

वृश्चिक- व्यवसायाला गती मिळेल. आज तुमचं एखादं खास काम पूर्ण होईल. तुमचं आरोग्यही ठीक असेल. गुंतवणुकीचे बेत आखाल. तुम्हाला आराम मिळेल. 

धनु- नोकरीमध्ये बढती मिळण्याची संधी आहे. स्वत:चा एखादा व्यवसाय असल्यास त्यावर लक्ष द्या. घर आणि कुटुंबामध्ये समतोल राखा. थकवा जाणवू शकतो. 

मकर- आर्थिक व्यवहार सुधारतील. नवे करार कराल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. जड आहाराचं सेवन करु नका. आरोग्याची काळजी घ्या. 

कुंभ- नव्या लोकांच्या संपर्कात याल. कामाचा व्याप वाढेल. सोबतच्या व्यक्तींची साथ मिळेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. अडकलेली आणि विचाराधीन कामं पूर्ण होतील. जुन्या अडचणींवर तोडगा निघेल. 

मीन- आज तुमच्या वाणीववर ताबा ठेवा. अनियमित दिनचर्येचा त्रास होईल. अतिउत्साहात कोणतीही गुंतवणूक करु नका. कामाचा व्याप वाढेल. तरीही दिवस चांगा व्यतीत होईल.