आजचे राशीभविष्य | बुधवार | २२ मे २०१९

कसा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: May 22, 2019, 08:59 AM IST
आजचे राशीभविष्य | बुधवार | २२ मे २०१९ title=

मेष : नवीन ऑफिस किंवा दुकान खरेदी करण्याचा विचार कराल. कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. नोकरदारवर्ग किंवा व्यवसायिकांनी योग्य दिशेत पुढे जाण्यासाठी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कामात सुधारणा होईल. जोडीदाराला भेट देऊ शकता. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. कोणत्याही गोष्टीत भावुक होऊ नका. 

वृषभ - आळस, थकवा जाणवेल. वाद होऊ शकतो. कामामुळे मनात टेन्शन राहील. जुन्या कामांचा मागोवा घ्या. एखाद्या खास व्यक्तीबाबत महत्त्वाची गोष्ट समजू शकते. प्रेमसंबंधांमध्ये मतभेद होऊ शकतात. परंतु वैवाहिक लोकांसाठी दिवस चांगला आहे.

मिथुन - व्यवसायात मित्रांची मदत मिळेल. दररोजच्या कामांसाठी दिवस चांगला आहे. कामात यश मिळेल. रखडलेली काम पूर्ण होतील. जुन्या गोष्टींमध्ये सुधारणा होऊ शकते. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे. जुन्या गोष्टी विसरण्यानेच फायदा होईल. छोट्याशा गोष्टीवर रागावल्यामुळे तुमचं काम बिघडू शकतं. 

कर्क - दररोजच्या कामात मन लागणार नाही. काही गोष्टी दु:खी करु शकतात. तुमच्या भावना आणि रागावर नियंत्रण ठेवा. अतिउत्साहात काम बिघडू शकते. ऑफिसमध्ये अधिक मेहनत करावी लागू शकते. पुढे जाण्यासाठी प्रयत्न करा. प्रेमींसाठी दिवस चांगला आहे.

सिंह - वायफळ वादापासून लांब राहा. अधिकारी तुमच्यावर खुश होतील. सहकाऱ्यांची मदत मिळेल. पैशांसंबंधी एखादी योजना आखू शकता. कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायात फायदा होईल. महत्त्वाच्या कामांकडे लक्ष द्या. विचार केलेली काम पूर्ण होतील.

कन्या - ऑफिसमधील कामात व्यस्त राहाल. चांगल्या परिणामांसाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आज हा विचार करु नका. सांभाळून राहा. छोट्या गोष्टींमुळे मूड खराब होण्याची शक्यता आहे. मनातील गोष्ट कोणाशीही शेअर करु नका. वैवाहिक जीवन सुखी राहील. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्या.

तुळ - व्यवसायात फायदा होईल. अधिक मेहनत करावी लागू शकते. दिवस चांगला आहे. दुसऱ्यांची जितकी मदत कराल तितका फायदा होईल. नवीन योजना आखू शकता. कामात सुधारणा होईल. प्रेमसंबंधांमध्ये चढ-उतार राहील. जोडीदाराची एखादी गोष्ट दु:खी करु शकते. वैवाहिकांना जोडीदाराची मदत मिळेल. तब्येतीच्या बाबतील हलगर्जीपणा करु नका. 

वृश्चिक - अधिक मेहनत घ्यावी लागेल. कामाचं टेन्शन वाढेल. जुन्या गोष्टी काढू नका. प्रेम व्यक्त करण्यासाठी संकोच करु नका. वाहन चालवताना सावध राहा. नोकरी आणि व्यवसायात तणाव आणि वायफळ खर्च होऊ शकतो. करियरचा गंभीरतेने विचार करा. जोडीदाराच्या भावनांचा सन्मान करा. 

धनु - दिवसभर व्यस्त राहाल. अधिकारी तुमच्या बोलण्यावर लक्ष देतील. कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल. अधिक मेहनतीने यश मिळेल. रखडलेली पैसे मिळू शकतात. व्यवसाय चांगला राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण लोकांशी भेट होऊ शकते. तब्येतील सुधारणा होईल. पती-पत्नीमध्ये संबंध चांगले राहील.

मकर - व्यवसायात वाढ होईल. समस्या संपू शकतात. समजूतीने काम करा. घरासंबंधी समस्या मार्गी लागतील. पैशांसंबंधी सुधारणा होतील. सतत काम राहील त्यामुळे थकवा येऊ शकतो. आराम करा.

कुंभ - व्यवसायात प्रगती होईल. नोकरीसाठी इंटरव्ह्यू दिल्यास चांगला जाईल. नोकरी, व्यवसायात पुढे जाण्यासाठी नवीन संधी मिळू शकतात. अधिकाऱ्यांसोबत संबंध चांगले राहतील. नवीन लोकांशी भेट होऊ शकते. इतरांवर सकारात्मक प्रभाव पाडू शकता. तुमच्या गोष्टी इतरांना समजून देण्यात यशस्वी व्हाल.

मीन - व्यवसायात फायदा होण्याची शक्यता कमी आहे. बदलीची शक्यता आहे. पैशांसंबंधी समस्या होऊ शकते. टेन्शन राहील. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. त्यांची मदत होऊ शकते. गरज पडल्यास तडजोड करण्यासाठी तयार राहा.

- डॉ. दीपक शुक्ल