Horoscope 17 October 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी घरात पाहुण्यांच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी तुम्ही आत्मविश्वासाने सगळी कामे वेळेत पूर्ण कराल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेतल्यास सर्व कामे पूर्ण होतील.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही वेळेवर परत करा. कोणत्याही समाज कार्यात स्वत:ला गुंतवून घेऊ नका.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. अविवाहित लोकांच्या लग्नाची चर्चा होऊ शकते. कामाला गती देण्यासाठी तुम्ही तंत्रज्ञानाशी संबंधित गोष्टींमध्ये गुंतवणूक करू शकता.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी मुलांच्या चुकीच्या संगतीमुळे तुम्ही खूप चिंतेत असाल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल पण दिलेली कामे वेळेवर पूर्ण करू शकाल
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या व्यवसायात भरपूर नफा मिळेल. तुमच्यावर काही जबाबदाऱ्याही सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही पार पाडणं गरजेचं आहे.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी छोट्या व्यावसायिकांनाही त्यांचा व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल. दीर्घकालीन नफ्याच्या दृष्टिकोनातून शेअर तसंच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी राहील. आईच्या आरोग्याच्या बाबतीत चांगली बातमी मिळणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी तुम्हाला आज रखडलेले पैसे मिळू शकणार आहेत. नातेवाईकांच्या मदतीने आर्थिक लाभ मिळू शकणार आहेत
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी हवामानातील बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी नोकरदार मंडळींनी नोकरीत दिलेली कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )
|
IND
(20 ov) 193/6
|
VS |
NED
176/7(20 ov)
|
| India beat Netherlands by 17 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
PAK
(20 ov) 199/3
|
VS |
NAM
97(17.3 ov)
|
| Pakistan beat Namibia by 102 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
UAE
(20 ov) 122/6
|
VS |
SA
123/4(13.2 ov)
|
| South Africa beat United Arab Emirates by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.