Horoscope 20 February 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. तरुणांनी काल्पनिक गोष्टी सत्यात उतरवल्या पाहिजे
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी एकापेक्षा अधिक व्यवसाय चालवणाऱ्या लोकांना आज थोडी काळजी घ्यावी लागेल. महिलांनी आज घरातल्या कामासोबत बाहेरच्या जबाबदाऱ्याही सांभाळल्या पाहिजे.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी तुमच्या व्यवसायात तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमच्या पगारात वाढ होऊ शकते किंवा तुम्हाला वरची पोस्ट मिळू शकते.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी व्यवसायात नुकसान सहन करावं लागेल. हुशार लोक लोभ दाखवून तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी घरी परतण्याची घाई केल्यास वरिष्ठांच्या नाराजीला सामोरं जावं लागू शकतं. तुम्ही तुमच्या मित्रांवर विश्वास ठेवा.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी विद्यार्थ्यांनी चुकीच्या मित्रांच्या संगतीपासून दूर राहा. व्यावसायिक आज न्यायालयीन प्रकरणात अडकू शकतात.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींनी आज कोणत्याही वादात पडू नये. भागीदारीत व्यवसाय करत असतील तर आर्थिक निर्णय घेण्याआधी त्यांनी आपल्या भागीदाराचंही मत घ्यावं.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी मेहनतीने काम पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि यामुळे तुमचे बॉस तुमच्यावर खुश होतील. भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ चांगला आहे.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी तुमचा बॉस तुमच्यावर खुश होईल. व्यवसायिकांना अधिक नफ्याची आशा असेल तर त्यांना तितकीच मेहनत देखील घ्यावी लागेल.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी कुणालाही पैसे उधार देऊ नका, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी तुमच्या ऑफिसच्या कामाशी संबंधित कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका. मानसिक तणावापासून दूर राहा.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी कामाच्या अतिरेकीमुळे तुम्हाला थकवा जाणवेल. घराच्या सुखसोयींसाठी पैसे उधार घेऊ नका, अन्यथा, तुम्हाला इतरांना पैसे देण्यात खूप त्रास होऊ शकतो.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )