Horoscope 24 September 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही नवीन योजना आखू शकता. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली असेल तर त्यात तुमची वाढ होईल.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी कोणतेही चुकीचे काम करू नका. नवीन काम सुरू करायचे असेल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन काम करा.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी तुमच्या जोडीदाराबरोबर एखाद्या मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. तुमचे काही काम अनेक दिवसांपासून अडकले होते, ते आज पूर्ण होईल.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळू शकतात. तुमचे मन धार्मिक कार्यात व्यस्त राहील. तुमच्या घरी कोणतेही पूजा, हवन वगैरे करू शकता.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी मनात कोणत्याही प्रकारचा तणाव राहणार नाही. ज्येष्ठांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. तुमच्या मुलांच्या बाजूने तुम्ही चिंतेत असाल.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींना मुलाच्या भविष्याची काळजी वाटू शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकता राहील. कुटुंबातील ज्येष्ठांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी व्यवसायात कोणतेही मोठे व्यवहार करू नका. आज काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. लग्नाशी संबंधित कोणताही प्रस्ताव आज येऊ शकतो.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी तुमच्या व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू करू नका. तुमच्या तब्येतीत चढ-उतार असतील.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाहन चालवताना काळजी घ्या. पैशांशिवाय तुमची अनेक कामे रखडू शकतात.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी कोणत्याही कामाच्या संदर्भात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. संयम राखून बोलण्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )