Horoscope 28 January 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींची आज जुनी इच्छा पूर्ण होणार आहे!

जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य

Updated: Jan 27, 2023, 10:21 PM IST
Horoscope 28 January 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींची आज जुनी इच्छा पूर्ण होणार आहे!

Horoscope 28 January 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

या राशीच्या व्यक्तींनी व्यापारामध्ये बदल कऱण्याचा विचार करू नये. कोणालाही पैसे उधार देऊ नका. आजच्या दिवशी मित्रमंडळींची साथ मिळणार आहे. मिठाई दान करा. शुभ रंग मरून

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी एक लांब प्रवास योग आहे. जुन्या मित्राची भेट होणार आहे. लोकरीचे कपडे दान करा.  शुभ रंग गुलाबी

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी मोठ्या भावाचे सहकार्य मिळणार आहे. कुटुंबात भांडणं अजिबात करू नका. आज प्रवास लाभदायक होणार आहे. खिचडी दही दान करा. शुभ रंग निळा

कर्क (Cancer)

आजचा दिवशी वरिष्ठांच्या सल्ल्याने नवीन व्यवसायात गुंतवणूक करा. वाहन चालवताना निष्काळजीपणा करू नका. घरी शुद्ध तुपाचा दिवा लावावा. शुभ रंग भगवा

सिंह (Leo)

आजच्या दिवशी संध्याकाळी वेळेवर घरी पोहोचा. तसंच आज तुम्हाला रखडलेले पैसे मिळणार आहेत. मुलाच्या आरोग्याकडे लक्ष द्या. फळे दान करा. शुभ रंग तपकिरी

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी शेअर बाजार तसंच म्युच्युअल फंड यामध्ये यश मिळू शकतं. तुमची सर्व कामं आज यशस्वी होणार आहेत.

तुला (Libra)

या राशीच्या व्यक्तींना आज नवीन मालमत्तेचा फायदा होणार आहे. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. आपल्या पालकांवर रागावू नका. खीर दान करा. शुभ रंग राखाडी

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी लांब प्रवास होणार आहे. तसंच आज तुमच्या मनावर नियंत्रण ठेवा. वृद्धांना पिवळी फळे द्या. शुभ रंग पांढरा

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी आनंद बरसणार आहे. मात्र खर्चामध्ये वाढ होणार आहे. भगवा तिलक लावावा. शुभ रंग लाल

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी महत्त्वाची कामं वेळेवर करा. वडिलांचा सल्ला अवश्य घ्यावा. नात्यामध्ये बेफिकीर राहू नका. गुलाबी कापड दान करा. शुभ रंग गुलाबी

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी जुनी इच्छा पूर्ण होणार आहे. तुमचं रहस्य कोणालाही सांगू नका. व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे. शुभ रंग तपकिरी

मीन (Pisces)

आजच्या दिवशी मानसिक तणाव राहणार आहे. कामामध्ये मोठ्यांचा सल्ला घ्यावा. नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. तांदूळ दान करा. शुभ रंग मरून