Horoscope 30 November : 'या' राशीच्या व्यक्तींचे भूतकाळात घडलेल्या गोष्टींमुळे वाद होतील!

जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.

Updated: Nov 29, 2022, 11:44 PM IST
Horoscope 30 November : 'या' राशीच्या व्यक्तींचे भूतकाळात घडलेल्या गोष्टींमुळे वाद होतील! title=

Horoscope 30 November : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.

मेष

तुमच्या आयुष्यात आज खूप आनंद येणार आहे. तुम्ही स्वतःचे घर खरेदी करण्याची योजना आखू शकता. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस शुभ आहे.

वृषभ

आजच्या दिवशी वडीलधाऱ्यांकडून आदर मिळेल. इतरांच्या पुढे जाण्याची तीव्र इच्छा होईल. आर्थिक परिस्थितीत मोठे बदल होतील.

मिथुन

आजच्या दिवशी तुम्ही दागिने खरेदी करू शकता. नवीन प्रयोग करून पुढे जाल. विविध आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

कर्क

आजचा दिवस चांगला असणार आहे. घरातून निघताना गोड खाऊन निघा. घाऊक विक्रेत्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे.

सिंह

आजच्या दिवशी लांबच्या प्रवासाचा योग येऊ शकतो. आज जुन्या मित्रांच्या भेटी होणार आहे. कामाच्या निमित्ताने धावपळ करावी लागेल.

कन्या

आजच्या दिवशी मित्रांकडून सहकार्य  मिळेल. कुटुंबातील वाद मिटण्याची शक्यता आहे. मात्र प्रवास शक्यतो करू नका.

तूळ

आजच्या दिवशी तुमच्या जुन्या इच्छा पूर्ण होणार आहे. तुमचं सिक्रेट कोणालाही सांगू नका. कामाच्या ठिकाणी परिवर्तनाचे योग आहेत.

वृश्चिक

आजच्या दिवशी घरी लवकर पोहोच. उधारीवर दिलेले पैसे परत मिळणार आहेत. 

धनु

या राशीच्या व्यक्तींना चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जीवनसाथीचे सहकार्य मिळणार आहे.

मकर

या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत खास असणार आहे. कामामध्ये चांगली बातमी मिळू शकते. तुमचं म्हणणं योग्य पद्धतीने मांडण्याची गरज आहे. 

कुंभ

आजच्या दिवशी महत्त्वाच्या कामाला प्रथम प्राधान्य द्या. घरात कोणत्याही कामामध्ये वडिलांचा सल्ला अवश्य घ्या. नाते संबंध टिकवण्यासाठी प्रयत्न करा.

मीन

पैसे कमवण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. करियरशी संबंधित वेगळी माहिती हाती येईल. भूतकाळात घडलेल्या गोष्टींनी वाद होतील.