Horoscope 8 August : आजच्या दिवशी 'या' राशीच्या व्यक्तींनी विनाकारण वाद घालू नये!

जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य

Updated: Aug 8, 2022, 07:04 AM IST
Horoscope 8 August : आजच्या दिवशी 'या' राशीच्या व्यक्तींनी विनाकारण वाद घालू नये! title=

मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.

मेष

आज तुमच्या पालकांचा आदर करा. कदाचित आजच्या दिवशी व्यवसायात येणारे अडथळे दूर होतील. 

वृषभ

आजच्या दिवशी जास्त रागराग करू नका. शिवाय तुमचं काम वेळेवर करा. 

मिथुन

अचानक एखादी भेटवस्तू तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. पैशाचा व्यवहार समजदारीने करा. हिरव्या वस्तू दान करणं फायदेशीर ठरेल.

कर्क

या राशीच्या व्यक्तींची आज व्यवसायाबाबातची चिंता वाढू शकते. त्याचप्रमाणे कोणत्याही वादात पडू नका. गोड भात दान करा.

सिंह

आजच्या दिवशी रागामुळे नुकसान होऊ शकते. तुमची गाडी आज कोणालाही देऊ नका.

कन्या

तुमच्यासंदर्भातील रहस्य आणि गुपीतं कोणालाही सांगू नका. तुम्हाला वडिलांकडून भेटवस्तू मिळू शकते.

तूळ

आजचा दिवस धावपळीचा जाण्याची शक्यता आहे. व्यवसायात नक्कीच फायदा होऊ शकतो. 

वृश्चिक 

आजच्या दिवशी नातेवाईकांना त्रास होईल असं काहीही करू नका. तुम्हाला कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो. 

धनु

आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी विनाकारण वाद घालू नये. त्याचशिवाय आरोग्याची चिंता दूर होईल. 

मकर 

तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामात व्यस्त असाल. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. 

कुंभ

आज काहीही असलं तरी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करा. 

मीन

आजच्या दिवशी नवीन कार्य योजना यशस्वी होईल. बोलण्यात गोडवा ठेवा.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x