Power of Positivity : साचेबद्ध आयुष्य जगताना हल्लीच्या दिवसांमध्ये प्रत्येकजण स्वत:ला विसरताना दिसत आहे. वेळेत नोकरीला पोहोचण्यापासून इच्छा नसतानाही पगारासाठी नोकरी करणाऱ्यांची संख्या यात जास्त आहे. या साऱ्यामध्ये आजुबाजूला घडणाऱ्या घटना, व्यक्ती कळत नकळत आपल्या आयुष्यावर काही अंशा का असेना पण नकारात्मक परिणम करतात. काही वेळेस ही नकारात्मकता इतकी वाढते की, आपण त्यामध्ये अडकून पडतो. अनेकदा या परिस्थितीतून सावरणं बऱ्याचजणांना अवघड जातं. अशा वेळी ध्यानधारणा किंवा आत्मचिंतन फायद्याचं ठरतं.
विचार बदला तरच परिस्थिती बदलेल असं अनेकजण म्हणतात. हा सिद्धांत अवलंबात आणल्यानंतरच तो कसा काम करतो हे लक्षात येतं. तुमच्या आजुबाजूला काही अशा गोष्टी घडतात, ज्या तुम्हाला सकात्मकतेचे संकेत देत असता. चला, तर मग हे बदल नेमके कसे असतात ते पाहुया...
- तुमची विचार करण्याची पद्धत सकारात्मकतेकडे झुकताना दिसते. इतरांना मदत करण्यालाच तुम्ही प्राधान्य देता. एखाद्या महान कार्यामध्ये मोलाचं योगदान देण्याची तुमची इच्छा असते.
- एखादी घटना घडण्यापूर्वी तुम्ही तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवता. अमुक एका कामाच्या परिणामांपेक्षा ते काम आपण करत आहोत याचाच आनंद तुम्हाला होते.
- तुम्हाला आजुबाजूच्या व्यक्तींकडून प्रचंड मान मिळत आहे, तुमच्याविषयी सकारात्मक चर्चा होत आहेत या संकेतांकडे दुर्लक्ष करु नका.
- दचकून झोपेतून जागं होण्याऐवजी आता तुम्ही शांत झोपता, चांगल्या स्वप्नांमध्ये रमताय तर तुमच्यावर नियतीच्या सकारात्मक तरंगांचा परिणाम होतो आहे असं समजा.
- धर्म शास्त्रामध्येही सकारात्मकतेला अनुसरून काही संदर्भांचा उल्लेख करण्यात आला आहे. जिथं, मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पहाटे 3 आणि 5 वाजण्याच्या सुमारास जाग येत असल्यास समजा तुमच्यावर देवाची कृपा आहे. ग्रहताऱ्यांची रचनाही तुम्हाला फळणार आहे याचे हे संकेत असतात.
(वरील माहिती सर्वसामान्य धारणांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )