कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गला जाताना आंबोली घाट लागणार नाही; चार तासांचा प्रवास फक्त एका तासांत पूर्ण होणार

Kolhapur Sindhudurg Amboli Ghat : कोल्हापूर ते सिंधुदुर्ग हे अतंर 128 किमी इतके आहे. या प्रवासासाठी चार तासांचा वेळ लागतो. मात्र, आता हा प्रवास एका तासात होणार आहे.

वनिता कांबळे | Updated: Dec 17, 2024, 11:10 PM IST
कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गला जाताना आंबोली घाट लागणार नाही; चार तासांचा प्रवास फक्त एका तासांत पूर्ण होणार title=

Nagpur Goa Shaktipeeth Expressway : कोल्हापूरमार्गे कोकणात जायचे असेल तर आंबोली घाटाशिवाय पर्याया नाही. मात्र, भविष्यात कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गला जाताना आंबोली घाट लागणार नाही. विशेष म्हणजे कोल्हापूर ते सिंधूदुर्ग हा चार तासांचा प्रवास फक्त एका तासांत पूर्ण होणार आहे. हे शक्य होणार ते नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे (nagpur goa shaktipeeth expressway). 

हे देखील वाचा... महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्याला गोव्यापेक्षा जास्त पसंती; जगभरातील मद्यप्रेमींचे आवडते ठिकाण

शक्तीपीठ महामार्ग हा महायुती सरकारचा सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प आहे. राज्यभरातील 12 जिल्ह्यांमधून जाणारा शक्तीपीठ महामार्ग गेम जेंचर ठरणार आहे.  2023 मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.  हा 802 किमी लांबीचा ग्रीनफिल्ड हायवे नागपूर ते गोव्याला थेट जोडणार आहे.  राज्यातील तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार असल्याने या महामार्गाला ‘शक्तीपीठ’ महामार्ग असे नाव देण्यात आलं होते. सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी रस्त्याने 18 तास लागतात, मात्र शक्तीपीठ महामार्गाच्या निर्मितीनंतर हा प्रवास केवळ आठ तासात होणार आहे. 

हे देखील वाचा... महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला! किल्ल्यात धरण, धरणात महल आणि तिन्ही बाजुंनी पाण्याचा वेढा

हा सहा पदरी शक्तीपीठ महामार्ग राज्यातील वर्धा, नांदेड, परभणी, , धाराशिव, यवतमाळ, हिंगोली बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना जोडणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणेज शक्तीपीठ महामार्गाने कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई , तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी ही तीन शक्तिपीठे जोडली जाणार आहेत. यासोबतच परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांनाही हा माहामार्द जोडला जाणार आहे. याशिवाय पंढरपूरचे श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर , नांदेडमधील गुरु गोविंदसिंग महाराजांचे गुरुद्वारा, सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर , पट्टणकोडोली, कणेरी , आदमापूर तीर्थक्षेत्रांना जोडला जाणार आहे. 

हे देखील वाचा... महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणांना टक्कर देते कोकणातील एक छोटसं गाव; छुपं हिल स्टेशन

या महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असतील तर 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असणार आहेत. या महामार्गातील सर्वात महत्वाचा टप्पा आहे आंबोली घाट सेक्शनमध्ये. आंबोली घाटाच्या पश्चिम घाटाखाली 2 बोगदे बांधण्याचे नियोजन आहे. हा बोगदा  21.9 किलोमीटर लांब असेल. हा देशातील सर्वात लांब बोगदा ठरु शकतो. हा बोगदा तयार झाल्यावर  कोल्हापूर ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रवास फक्त 1 तासात होणार आहे. कारण आंबोली घाटमार्गे हा प्रवास तब्बल चार तासांचा आहे. 
शक्तीपीठ महामार्गात अडथळे असतील तर पर्याय शोधले जातील. विरोध असलेल्या भागात फ्लायओव्हर किंवा सध्या असलेल्या माहामार्गाला शक्तीपीठ महामार्ग जोडता येईल अनुषंगाने बदल केले जातील असे सांगत लवकरच शक्तीपीठ महामार्गाबाबात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.