... म्हणून जेवताना पानात घेत नाही 3 पोळ्या? यामागे धार्मिक, वैज्ञानिक कारण

जेवताना तुमच्या पानात असतात तीन पोळ्या? कधीही घेऊ नका तीन पोळ्या यामागे धार्मिक, वैज्ञानिक कारण...                                                                                                                                                                                                                                                                                                                                        

Updated: Apr 9, 2022, 04:17 PM IST
... म्हणून जेवताना पानात घेत नाही 3 पोळ्या? यामागे धार्मिक, वैज्ञानिक कारण title=

मुंबई : हिंदू धर्मात उपवास, सण  संबंधित अनेक गोष्टीही सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये झोपणे, उठणे, खाणे-पिणे यांसाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. हे नियम गेल्या अनेक वर्षांपासून  चालत आले आहेत. एवढंच नाही तर हे नियम आता परंपरेचा भाग झाले आहेत. त्यामुळे अनेक लोक या परंपरा नक्कीच पाळतात पण त्यामागील कारणे त्यांना माहीत नाहीत. 

अशीच एक परंपरा म्हणजे जेवणाच्या ताटात 3 पोळ्या एकत्र न देण्याची परंपरा. यामागे केवळ धार्मिक कारण नाही, तर वैज्ञानिक कारणही कारणीभूत आहे.

मृत व्यक्तीच्या ताटात ठेवतात 3 पोळ्या
जेव्हा व्यक्तीचं निधन होतं, तेव्हा तेराव्या दिवशी जेवणाचं पान दिलं जातं, त्या पानात तीन पोळ्या ठेवतात. त्यामुळे ताटात 3 पोळ्या  ठेवणे हे मृत व्यक्तीचे अन्न मानले जाते.. असा समज आहे

याशिवाय एका ताटात 3 पोळ्या एकत्र ठेवून खाल्ल्यास त्याच्या मनात इतरांशी भांडण्याची भावना निर्माण होते, असे देखील सांगितले जाते.

यामागील वैज्ञानिक कारण..
कधीही जास्त जेवू नये. म्हणून वैज्ञानिकदृष्ट्या जेवताना पानात तीन पोळ्या घेवू नये. कधीही जेवताना पानात 2 पोळी, एक वाटी भाजी आणि थोडा भात असायला हवा.. जास्त जेवण केल्यास आरोग्याला धोका निर्माण होवू शकतो. 

(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)