प्रेतयात्रा दिसल्यास शास्त्रानुसार कराव्या या 3 गोष्टी

भगवत गीतेध्ये भगवान श्रीकृष्णांनी एका गोष्टीचा उल्लेख केला आहे की, मृत्यू एक असं सत्य आहे ज्याला टाळता येणार नाही. ज्याने जन्म घेतलाय त्याचा मृत्यू हा होणारच आहे.

Updated: Feb 8, 2018, 01:45 PM IST
प्रेतयात्रा दिसल्यास शास्त्रानुसार कराव्या या 3 गोष्टी title=

मुंबई : भगवत गीतेध्ये भगवान श्रीकृष्णांनी एका गोष्टीचा उल्लेख केला आहे की, मृत्यू एक असं सत्य आहे ज्याला टाळता येणार नाही. ज्याने जन्म घेतलाय त्याचा मृत्यू हा होणारच आहे.

मृत्यूनंतर पुनर्जन्म होतो याबाबत देखील भारतीय संस्कृतीत बऱ्याच अशा कथा आहेत. पण रस्त्यावरुन जातांना तुम्हाला प्रेतयात्रा दिसली तर काय करावं याबाबत पुराणात काय सांगितलंय हे तुम्हाला सांगणार आहोत.

प्रेताला नमस्कार करावा

तुम्ही पाहिलं असेल की प्रेतयात्रा निघाली असेल तर रस्त्यात त्याला अनेक लोकं प्रणाम करतात आणि शिव-शिव असं म्हणतात. याच्या मागे मान्यता अशी आहे की, जेव्हा आत्मा शरीर सोडतो तेव्हा तो त्याच्या सोबत कष्ट, दु:ख आणि अशुभ सर्व गोष्टी घेऊन जातो. यातूनच त्या व्यक्तीला 'शिव' म्हणजे मुक्ती मिळावी म्हणून शिव-शिवचं उच्चारण करतात.

मृत आत्म्यासाठी प्रार्थना

प्रेतयात्रा पाहिल्यानंतर काही लोकं रस्त्यात थांबतात हिंदू धर्माच्या नियमानुसार प्रेतयात्रा पाहिल्यानंतर थांबून त्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली पाहिजे. धार्मिक दृष्टिकोणा व्यतिरिक्त ज्योतिष शास्त्रात देखील प्रेतयात्रा पाहणं शुभ मानलं गेलं आहे. अशी मान्यता आहे की त्यानंतर तुमच्या मनातील गोष्टी देखील पूर्ण होतात.

यज्ञाच्या बरोबरीचं पुण्य

शास्त्रानुसार जी व्यक्ती प्रेतयात्रेत खांदा देतो. त्याला यज्ञा बरोबरीचं पुण्य मिळतं. शास्त्रानुसार यानंतर त्याला अंघोळ केली पाहिजे. तेव्हा त्याचं शरीर शुद्ध होतं.

या सर्व आतापर्यंत चालत आलेल्या मान्यता आहेत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.