सूर्यग्रहण : 'या' 4 राशींमध्ये होणार सकारात्मक बदल

13 फेब्रुवारीला महाशिवरात्रीनंतर दोन दिवसांनी सूर्यग्रहण आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 8, 2018, 07:46 AM IST
सूर्यग्रहण : 'या' 4 राशींमध्ये होणार सकारात्मक बदल  title=

मुंबई : 13 फेब्रुवारीला महाशिवरात्रीनंतर दोन दिवसांनी सूर्यग्रहण आहे. 

सूर्यग्रहण या महिन्यात 15 जानेवारीला असून या दिवशी 12 राशींसाठी खास असणार आहे. त्यातील 4 राशिंवर याचा अधिक चांगला प्रभाव पडणार आहे. जाणून घ्या यामध्ये कोणत्या 4 राशींचा समावेश आहे. आणि सूर्यग्रहणाचा या 4 राशींवर काय परिणाम होणार आहे. 

मेष ,वृश्चिक, कन्या आणि धनू या चार राशींवर सूर्यग्रहणाचा सकारात्मक परिणाम होणार आहे. 

मेष : मेष राशीच्या लोकांवर सूर्यग्रहणाचा चांगला परिणाम पाहता येणार आहे. या राशीच्या लोकांवर लक्ष्मीची खास कृपा असणार आहे. आर्थिक गोष्टींचा लाभ होणार आहे. अनेक नवीन काम तुम्ही या दिवशी सुरू करू शकता. 

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांवर देखील याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. आर्थिक गोष्टीत चांगला परिणाम जाणवेल. समाजात वृश्चिक राशीच्या लोकांना चांगला मान मिळेल. हा दिवस शुभकाळ असणार आहे. त्यामुळे या दिवसाचा खूप चांगला फायदा करून घेता येईल. 

कन्या : कन्या राशीच्या लोकांबाबत चुकीच्या विचार करणाऱ्यांची संख्या जास्त असली तरीही कन्या राशीला याचा फायदा होणार आहे. कोणतंही कार्य सुरू केल्यास त्यांना  यामध्ये सफलता प्राप्त होणार आहे. 

धनू : सकारात्मक लाभ होणाऱ्या राशींमध्ये धनू ही चौथी राशी आहे. या राशीच्या लोकांना देखील सूर्यग्रहणात चांगला फायदा होणार आहे. समाजात वेगळा मान मिळेल. तसेच लक्ष्मीची कृपा असणार आहे.