तुम्ही देवाला दाखवलेला प्रसाद तेथेच ठेवता का? नैवद्य दाखविण्याचे 'हे' नियम जाणून घ्या

Prasad Offering Rules : हिंदू धर्मात देवी-देवतांची पूजा करण्याचा नियम आहे. मात्र, यासाठी धार्मिक शास्त्रांमध्ये अनेक प्रकारचे नियम सांगण्यात आले आहेत. पूजेदरम्यान या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला पूर्ण परिणाम मिळणार नाहीत. 

Updated: Jul 4, 2023, 02:03 PM IST
तुम्ही देवाला दाखवलेला प्रसाद तेथेच ठेवता का? नैवद्य दाखविण्याचे 'हे' नियम जाणून घ्या title=

Prasad Offering Rules : हिंदू धर्मात देव-देवतांची पूजा केली जाते. तसेच अनेक घरांमध्ये देवघर असते. त्याठिकाणीही पूजा केली जाते. घरातील वातावरण चांगले राहावे, मन:शांती प्राप्त होण्यासाठी अनेक लोक देवाची उपासना करतात. अनेकवेळा देवाला नैवद्यही दाखवला जातो. मात्र, नैवद्य दाखविण्याचे काही नियम आहेत. ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, काही लोक देवाला भोग अर्पण केल्यानंतर प्रसाद तेथेच सोडतात, हा चुकीचा मार्ग आहे. अनेक घरांमध्ये रोज पूजाअर्चा केली जाते. मनःशांती, सकारात्मकता, आनंद, समृद्धी आणि शुभेच्छा यासाठी लोक देवाची उपासना करतात. पूजेसाठी शास्त्रांमध्ये काही खास नियम सांगण्यात आले आहेत. ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. देवाला टिळक लावणे, पाठ किंवा मंत्र पठण करणे, भोग अर्पण करण्यापासून आरती करणे असे नियम आहेत. 

हिंदू धर्मात देवी-देवतांची पूजा करण्याचा नियम आहे. मात्र, यासाठी धार्मिक शास्त्रांमध्ये अनेक प्रकारचे नियम सांगण्यात आले आहेत. पूजेदरम्यान या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला पूर्ण लाभ मिळणार नाहीत. तसेच भोग म्हणून देवाला अर्पण केल्या जाणाऱ्या प्रसादाबाबतही नियम आहेत. पुष्कळ लोक पूजा करताना देवाला भोग अर्पण करतात आणि नंतर तेथेच सोडतात. तसे करणे योग्य मानले जात नाही. यामुळे देवाला राग येऊ शकतो आणि पूजा देखील पूर्ण मानली जात नाही. पूजेच्या वेळी देवाला अर्पण केलेला भोग किंवा प्रसाद चुकूनही तिथे ठेवू नये. प्रसाद आणि भोग सोडून विश्वसेन, चंडेश्वर, चंदनशु आणि चांडाली या वाईट शक्ती परमेश्वराकडे येतात. त्यामुळे घरात नकारात्मकता येऊ लागते. अशावेळी पूजा पूर्ण झाल्यावर देवतेकडून प्रसाद घेऊन कुटुंबासमवेत घ्यावा.

मनुष्य नियमांचे पालन करुन पूजा करतो, देव त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो. पण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पूजा केली तर त्यामुळे देवताही नाराज होऊ शकतात. शास्त्रात देवाला अन्न अर्पण करण्याचे नियम सांगितले आहेत. जर तुम्ही पूजेत देवाला भोग अर्पण करत असाल तर तुम्हाला त्यासंबंधीचे नियम माहित असणे आवश्यक आहे.

काय आहे नियम?

देवाला नेहमी फक्त सात्विक वस्तू अर्पण करा. प्रसाद कधीही जमिनीवर ठेवू नका. प्रसाद फक्त पितळेच्या आणि चांदीच्या भांड्यातच द्यावा. देवाजवळ प्रसादासोबत पाणी जरूर ठेवावे. जेव्हा तुम्ही देवाला अन्न अर्पण करता तेव्हा यावेळी  ‘त्वदीयं वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्पये, गृहाण सम्मुखो भूत्वा प्रसीद परमेश्वर।।’ या मंत्राचा जप करावा.

प्रसाद सर्वांना वाटावा

प्रसाद इतरांना वाटावा. देवाला अर्पण केलेला भोग पूजेनंतर घ्यावा. ते कुटुंब आणि इतर लोकांमध्ये वाटला पाहिजे. उपवास नसेल तर प्रसादही घ्यावा. हे देवाबद्दल आनंद आणि आदर व्यक्त करण्यासाठी आहे. यामुळे देवही प्रसन्न होतो आणि आशीर्वाद देतो.

असा नैवद्य देवाला दाखवू नये

देवाला अन्न अर्पण करण्याचे काही नियम आहेत, त्यानुसार देवाला कधीही मीठ आणि मिरचीचे अन्न अर्पण करु नये. तसेच लसूण आणि कांदा घालून तयार केलेले असे अन्न कधीही देवाला अर्पण करु नये. पूजेत नेहमी फळे आणि मिठाई अर्पण करा. काही विशेष विधींमध्ये सात्विक गोष्टी अर्पण केल्या जाऊ शकतात.

 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)