2 ऑक्टोबरपासून 'या' राशीसाठी 18 दिवस सुखाचे; नोकरी-करिअरमध्ये मोठा लाभ

2 ऑक्टोबर रोजी बुधच्या प्रवेशामुळे काही राशीच्या व्यक्ती भाग्यवान होतील हे मात्र नक्की.

Updated: Oct 1, 2021, 07:47 PM IST
2 ऑक्टोबरपासून 'या' राशीसाठी 18 दिवस सुखाचे; नोकरी-करिअरमध्ये मोठा लाभ

मुंबई : ज्योतिषशास्त्रात बुध हा बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी आणि मित्र यांचा कारक ग्रह असल्याचे म्हटले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा बुध शुभ असतो, तेव्हा व्यक्तीचे आयुष्य आनंदाने भरलेले असते. सूर्य आणि शुक्र हे बुधचे मित्र आहेत, तर चंद्र आणि मंगळ हे त्याचे शत्रू ग्रह आहेत. यावेळी बुध प्रतिगामी अवस्थेत आहे म्हणजे बुध उलटे फिरत आहे. 2 ऑक्टोबर रोजी बुधच्या प्रवेशामुळे काही राशीच्या व्यक्ती भाग्यवान होतील हे मात्र नक्की.

मिथुन राशि

बुध ग्रहामुळे मिथुन राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी असेल. तसेच या काळात मिथून राशीच्या लोकांना हव्या असलेल्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळेल.
या राशीतील लोकांचा जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल.
तर या राशीच्या लोकांच्या लहान मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
या राशीच्या लोकांची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल तसेच हे लोक फायद्यात राहातील.
धन लाभ होण्याची देखील शक्यता आहे

कन्या

या दरम्यान कन्या राशीच्या लोकांचे अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील.
करिअरमध्ये नवीन संधी मिळतील.
हे लोकं आपल्या जोडीदाराशी सुसंवाद ठेवतील
यांचे कौटुंबिक जीवन आनंदी असेल तर आर्थिक बाजू मजबूत होतील
नोकरी आणि व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे.

धनु

या काळात कामाच्या ठिकाणी धनु राशीच्या लोकांचे कौतुक होईल.
जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल.
या राशीच्या लोकांना पैसा आणि नफा होईल, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल.
कामात यश मिळण्याची शक्यता आहे.
हा काळ या राशीच्या लोकांसाठी नोकरी आणि व्यवसायासाठी वरदानापेक्षा कमी नाही. त्यामुळे मेहनत करा ते वाया जाणार नाही.

कुंभ

या काळात कुंभ राशीच्या लोकांचे भाग्य त्यांना साथ देईल.
यांचे तारे अनुकूल असतील.
शैक्षणिक क्षेत्रात ते चांगले काम करातीस, फक्त जोडीदाराशी मतभेद टाळावे.
प्रतिष्ठा आणि स्थान वाढेल.