Vipreet Rajyog: ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य देव दर महिन्याला त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. सूर्याच्या गोचरता प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होतात. याचप्रमाणे सूर्याच्या गोचरमुळे अनेक शुभ आणि अशुभ राजयोग तयार होतात. 16 डिसेंबरला सूर्य धनु राशीत प्रवेश करत असल्याने विपरीत राजयोग तयार झाला आहे. विपरित राजयोग तयार झाल्याने काही राशीच्या आयुष्यात आनंद येणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार आठव्या घराचा स्वामी सहाव्या किंवा बाराव्या भावात गेल्यावर विपरित राजयोग तयार होतो. सूर्याने धनु राशीत प्रवेश केल्यामुळे मकर राशीच्या बाराव्या घरात प्रवेश झाला असून तो या राशीतील आठव्या घराचा स्वामी आहे. यामुळे विपरीत राजयोग तयार झाला आहे. विपरीत राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
या राशीच्या बाराव्या घरात विपरित राजयोग तयार होत आहे. अशा स्थितीत या जीवनातील समस्या संपुष्टात येऊ शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. खराब आरोग्यापासून आराम मिळू शकतो. यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना संशोधन अभ्यासासाठी परदेशात जाण्याची इच्छा आहे. त्यांनाही यश मिळू शकणार आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते.
नवव्या घरात विपरित राजयोग तयार झाल्याने या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. धार्मिक गोष्टींमध्ये उत्साहाने सहभागी होऊ शकाल. यावेळी विद्यार्थ्यांनाही लाभ मिळू शकतो. भाऊ-बहिणींसोबत तुमचा वेळ चांगला जाणार आहे. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची अनेक शक्यता आहेत. कायदेशीर बाबींमध्येही यश मिळू शकणार आहे. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते.
तूळ राशीच्या लोकांसाठी विपरित राजयोग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढू शकतो. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. वरिष्ठ अधिकारीही तुमच्या कामात लक्ष देतील. व्यवसायात तुम्हाला काही प्रकल्प मिळू शकतात. राजयोगाच्या प्रभावामुळे ते नवीन वाहन, घर खरेदी करण्याचा विचार करू शकतात. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )