Guru Ast February 2022 : ३२ दिवस 'या' ६ राशींच्या लोकांनी राहावं सांभाळून, 'अस्त गुरू' घेऊन येणार संकट

अस्त होत असलेला गुरू ६ राशींवर खूप मोठा परिणाम करत आहे. २७ मार्चपर्यंत असणाऱ्या अस्त गुरूचा या राशींवर काय परिणाम होणार आहे. 

Updated: Feb 18, 2022, 07:48 AM IST
Guru Ast February 2022 : ३२ दिवस 'या' ६ राशींच्या लोकांनी राहावं सांभाळून, 'अस्त गुरू' घेऊन येणार संकट

मुंबई : दोन दिवसांनंतर म्हणजे १९ फेब्रुवारी २०२२ रोजी गुरू अस्त होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, सर्वात जास्त शुभ ग्रह म्हणून ओळखला जाणारा देवगुरू बृहस्पतीचा अस्त होणार आहे. हे अशुभ मानलं जातं. अस्त गुरूचा १२ राशींवर होणार शुभ-अशुभ परिणाम होत असतो. (Guru Ast February 2022 : These Zodiac Natives face trouble in Life )  यावेळी अस्त होत असलेला गुरू ६ राशींवर खूप मोठा परिणाम करत आहे. २७ मार्चपर्यंत असणाऱ्या अस्त गुरूचा या राशींवर काय परिणाम होणार आहे. 

वृषभ 

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांकरता बृहस्पतीचा अस्त कामात संकट आणणार. वर्कप्लेसमध्ये असंतोषाचं वातावरण असेल. सहकाऱ्यांसोबत खटके उडतील. धैर्य ठेवून काम करा. 

कर्क 

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांकरता बृहस्पतीचा अस्त होणं करिअरवर संकट आणू शकतं. मेहनतीचं फळ मिळणार नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही संकंट दिसेल. 

कन्या 

कन्या (Virgo)

कन्या राशीच्या लोकांना करिअरमध्ये संकट जाणवेल. जॉब बदलावा देखील लागू शकतो. व्यवसायात संकट आडवं येईल. कोणताही निर्णय विचार करून घ्या 

धनू 

धनु (Sagittarius)

धनू राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये संकट येऊ शकतं. त्यांची ट्रान्सफर देखील होऊ शकते. नोकरी बदलण्याचा विचार करा. कोणताही निर्णय शांतपणे घ्या. 

मकर

मकर (Capricorn)

मकर राशीच्या कुटुंबावर संकट येऊ शकतं. कौटुंबिक वाद डोकं वर करतील. ज्येष्ठांसोबत अदबीने वागा. 

कुंभ 

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांना अपयश पचवावं लागेल. मोठं संकट ओढावू शकतं. सतर्क राहा.