Guru Vakri 2023: लवकरच मेष राशीत गुरु होणार वक्री; तब्बल 118 दिवस 'या' राशींवर घोंगावणार संकट

Guru Vakri 2023: याचवेळी काही राशी आहेत ज्यांनी थोडी काळजी घेणं आवश्यक असणार आहे. चला जाणून घेऊया गुरूच्या वक्री चालीमुळे कोणत्या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल.

सुरभि जगदीश | Updated: Aug 26, 2023, 05:56 PM IST
Guru Vakri 2023: लवकरच मेष राशीत गुरु होणार वक्री; तब्बल 118 दिवस 'या' राशींवर घोंगावणार संकट title=

Guru Vakri 2023: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह उल्टी चाल देखील चालतात. ग्रहांचा स्वामी गुरु 4 सप्टेंबर रोजी दुपारी 4.58 वाजता मेष राशीत वक्री होणार आहे. यावेळी गुरु ग्रह 31 डिसेंबरपर्यंत याच अवस्थेत राहणार आहे. दरम्यान गुरु ग्रहाच्या या चालीचा वाईट परिणाम काही राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. जाणून घेऊया गुरुच्या वक्री चालीचा कोणत्या राशींवर विपरीत परिणाम होणार आहे ते पाहुयात.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मेष राशीत गुरूच्या वक्री चालीमुळे काही राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो. मात्र याचवेळी काही राशी आहेत ज्यांनी थोडी काळजी घेणं आवश्यक असणार आहे. चला जाणून घेऊया गुरूच्या वक्री चालीमुळे कोणत्या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल.

गुरूच्या वक्री चालीमुळे 'या' राशीच्या लोकांनी रहावं सावध

मेष रास (Aries Zodiac Sign)

गुरुच्या वक्री चालीमुळे या राशीच्या लोकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात अनावश्यक खर्चामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. वैवाहिक जीवनातही काही अडचणी येऊ शकतात. त्याचसोबत आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंबातील जवळच्या व्यक्तीशी एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. 

सिंह रास (Leo Zodiac Sign)

या राशीत गुरु हा पाचव्या आणि आठव्या घराचा स्वामी आहे. या राशीत गुरु वक्री झाल्यामुळे अनेकांना समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. जुना आजार पुन्हा एकदा समोर येऊ शकतो. वैवाहिक जीवनातही समस्या निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. 

तूळ रास ( Libra Zodiac Sign)

या राशीमध्ये गुरु सातव्या घरात वक्री आहे. अशा परिस्थितीत वैवाहिक जीवनात अनेक समस्या येऊ शकतात. एखाद्या गोष्टीवरून मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. करिअरमध्ये काही अडचणी येऊ शकतात.
 तसंच तुम्हाला थोडी काळजी घेण्याची गरज आहे. नोकरी-व्यवसायात अपयशाला सामोरं जाण्याची तयारी ठेवाय आर्थिक परिस्थितीवरही वाईट परिणाम होऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीतही गाफील राहू नका. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )