Hanuman Jayanti 2024 Date : हिंदू धर्मात देवतांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. गणेश जयंतीनंतर फाल्गुन महिन्यात येतो तो सण म्हणजे महाशिवरात्री आणि त्यानंतर वेध लागतात ते हनुमान जयंतीचे. पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानाची जयंती साजरी करण्यात येते. माता अंजनी पुत्राचा जन्म यावर्षी कुठल्या तारीखेला येणार आहे. संकट मोचन हनुमान जयंती 2024 ची तारीख, वेळ आणि महत्त्वाची माहितीबद्दल जाणून घेऊयात.
यावर्षी हनुमानाची जयंती 23 एप्रिल 2024 ला साजरी करण्यात येणार आहे. 23 एप्रिल 2024 ला मंगळवार आहे. मंगळवार हा दिवस हनुमानला समर्पित आहे. त्यामुळे यंदाची हनुमान जयंती खास असणार आहे. यादिवशी हनुमान मंदिरात विशेष आकर्षक सजावट, सुंदरकांड पठण, भजन, व्रत, दान, पठण, कीर्तनाने दंग होणार आहे.
हनुमानाचा जन्म हा उत्तर भारतात पहिली चैत्र महिन्याची तिथीला आणि दक्षिण भारतात दुसरी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची तिथीला साजरी करण्यात येतो.
पंचांगानुसार, चैत्र पौर्णिमा तिथी 23 एप्रिल 2024 ला पहाटे 03.25 वाजेपासून 24 एप्रिल 2024 ला पहाटे 05.18 वाजेपर्यंत असणार आहे.
हनुमान पूजेची वेळ - सकाळी 09.03 ते दुपारी 1.58
पूजेच्या वेळा - रात्री 08.14 ते रात्री 09.35
हनुमान जयंती, 23 एप्रिल 2024 ला चित्रा नक्षत्र रात्री 10.32 मिनिटांपर्यंत असणार आहे. यानंतर लवकरच स्वाती नक्षत्र सुरू होणार आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी चंद्र कन्या राशीत तर सूर्य मेष राशीत असणार आहे.
हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करा. या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे घालणे शुभ असणार आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंगबलीला अर्पण करा. चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा. पूजेमध्ये बजरंगबलीचा आवडता प्रसाद गुळ आणि हरभरा आणि बुंदीचे लाडूही अर्पण करा. आता 7 वेळा हनुमान चालिसाचा पाठासोबत घरी रामायण पठण करा. आरतीच्या दिवसानंतर आपल्या क्षमतेनुसार कपडे, अन्न आणि पैसे गरजूंना दान करणे शुभ मानलं जातं.
शृंगी ऋषींच्या यज्ञात अग्निदेवांना मिळालेली खीर राजा दशरथाने तीन राण्यांमध्ये वाटून दिल्याचे शास्त्रात वर्णन करण्यात आलं आहे. इतक्यात एक गरुड तिथे पोचला आणि प्रसाद खीरची वाटी चोचीत भरून ते उडून गेले. किष्किंधा पर्वतावर शिवाची पूजा करणाऱ्या अंजनी मातेच्या कुशीत हा भाग पडला अशी आख्यायिका आहे. माता अंजनीकडून हा प्रसाद ग्रहण केल्याने हनुमानजींचा जन्म अंजनी मातेच्या पोटी झाला अशी मान्यता आहे. बजरंगबलीला वायु पूत्र असेही म्हटलं जातं.
नोकरीत येणारे अडथळे दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीला गुलाबाच्या फुलांमध्ये केवडा अर्पण करा.
दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुपात सिंदूर मिसळून हनुमानजींना अर्पण करा.
व्यवसाय वाढवण्यासाठी हनुमान जयंतीला बजरंगबलीला सिंदूर अर्पण करा.
हनुमान जयंतीला मंदिराच्या छतावर लाल ध्वज लावणे शुभ मानले जाते. या उपायामुळे अचानक येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळण्यास फायदा होतो.
आर्थिक समृद्धीसाठी हनुमान जयंतीच्या दिवशी पांढऱ्या कागदावर सिंदूर लावून स्वस्तिक बनवा आणि आधी हनुमानजींना अर्पण करा आणि नंतर ते आपल्या तिजोरीत ठेवल्याने फायदा होतो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)