Valentine Day 2023: व्हॅलेंटाईन डेला तुमच्या राशीनुसार निवडा कपड्याचा रंग, नक्की 'हो' म्हणेल!

Valentine Day Astrology: मचं वय कितीही असलं तरी पार्टनरबरोबर व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची संधी गमावू नका. व्हॅलेंटाईन डे तुम्ही चांगल्या लुकमध्ये दिसणं गरजेचं आहे. 

Updated: Feb 9, 2023, 04:54 PM IST
Valentine Day 2023: व्हॅलेंटाईन डेला तुमच्या राशीनुसार निवडा कपड्याचा रंग,  नक्की 'हो' म्हणेल! title=
Valentine Day Astrology

Astro Tips For Valentine Day 2023: सध्या व्हॅलेंटाईन डेची (Valentine Day 2023) उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. आतापासूनच लगबग सुरू झाली आहे. काय गिफ्ट द्यावं?, असा सवाल सर्वांनाच पडला असेल. तुम्ही प्रपोज डे (propose day) दिवशी प्रपोज केलं असलं तरी काहीजण याचं उत्तर व्हॅलेंटाईन डेला देतात. त्यामुळे या दिवशीची अनेकजण आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच व्हॅलेंटाईन डेला तुमच्या राशीनुसार कपड्याचा रंग निवडा, असं सांगितलं जातं.

व्हॅलेंटाईन डे म्हणजे 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन वीकचा (Valentine's Week) शेवटचा दिवस असतो. कपल्ससाठी हा दिवस अगदी स्पेशल असतो. तुमचं वय कितीही असलं तरी पार्टनरबरोबर व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची संधी गमावू नका. व्हॅलेंटाईन डे तुम्ही चांगल्या लुकमध्ये दिसणं गरजेचं आहे.

जाणून घ्या राशींनुसार रंग 

मेष (Aries) : मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे या राशीचे लोक भगव्या रंगाचे कपडे घालू शकतात. त्यामुळे परस्पर आनंद आणि प्रेम वाढेल. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा आहे.

वृषभ  (Taurus) : वृषभ राशीच्या लोकांनी व्हॅलेंटाइन डेला हिरवे कपडे घालावेत. हिरवा रंग मनात सकारात्मक विचार आणतो आणि प्रेमाचा संवाद करतो.

मिथुन (Gemini): मिथुन राशीच्या लोकांसाठी पिवळा किंवा भगवा रंग देखील शुभ मानला जातो. प्रेम वाढेल आणि जीवनभर साथ देईल, असा जोडीदार मिळेल.

कर्क (Cancer) : कर्क राशीच्या लोकांनी लाल रंगाचे कपडे घालावेत. विवाहित लोकांच्या जीवनात पतीसोबतचे नाते मजबूत होईल.

सिंह (Leo) : सिंह राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे चांगलं ठरेल.

कन्या (Virgo) : कन्या राशीचे लोक जोडीदाराला प्रभावित करण्यासाठी निळ्या रंगाचे कपडे निवडू शकतात. यामुळे नातेसंबंध मजबूत राहण्यास मदत होते

तूळ (Libra) :  तूळ राशीचे लोक व्हॅलेंटाइन डेला काळे कपडे घालू शकतात. त्यामुळे तुमच्या जोडीदाराचा निर्णय बदलू शकतो.

वृश्चिक (Scorpio): वृश्चिक राशीच्या लोकांसाठी भगव्या रंगाचे कपडे परिधान करणे भाग्यवान ठरेल.

धनु (Sagittarius) : धनु राशीचे लोक लाल रंगाचे कपडे परिधान करून जोडीदाराला आकर्षित करू शकतात.

मकर (Capricorn) : ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांनी क्रीम रंगाचे कपडे घातले तर चांगली बातमी मिळण्याची शक्यता असते.

कुंभ  (Aquarius) : कुंभ राशीमधील व्यक्तींनी खास दिवशी बॉटल ग्रीन कलरचे कपडे घातले तर त्याचा शुभ परिणाम दिसून येतो.

मीन (Pisces): मीन राशीच्या लोकांना पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे अचानक एखादी व्यक्ती आयुष्यात पुन्हा येऊ शकते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)