राशीभविष्य : 'या' व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता

12 राशींच भविष्य 

Updated: Mar 11, 2020, 09:15 AM IST
राशीभविष्य : 'या' व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता title=

मेष - काही कामांमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. मेहनत जास्त करावी लागेल. नोकरी बदलण्याचा विचार कराल. पण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. कोणत्याही कोमात अतीघाई केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले असेल.  

वृषभ - नोकरी करणाऱ्याची बढती होण्याची शक्यता आहे. सोबत काम  करणाऱ्यांकडून मदत मिळेल. जीवनसाथीकडून मदत मिळेल. अविवाहित लोकांचं जीवन चांगलं असेल. चांगल्या संधी उपलब्ध होतील. जीवनसाथीकडून आर्थीक मदत मिळेल. 
 
मिथुन - ऑफिसमधील वरिष्ठ लोकांना प्रभावित कराल. अधिक उत्पन्न आणि नोकरी बदल्याचा विचार कराल. यामध्ये नशीब साथ देईल. अडकलेले पैसे मिळतील. अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. 

कर्क -  नवीन काही करण्याचा प्रयत्न कराल पण जे काम पूर्वीपासून करत आहात त्याकडे लक्ष द्या. केलेल्या कामाचा परिणाम मिळू शकतो. नवीन प्रेमसंबंध सुरु होण्याची शक्यता आहे. पैशांसंबंधी अनेक योजना मनात सुरु राहतील. जुन्या मित्राची भेट होण्याचा योग आहे. नवीन नोकरीची संधी आहे.

सिंह - अधिकाऱ्यांकडून मदत मिळेल. ऑफिस आणि व्यवसाय करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून सल्ला घ्या. जीवनसाथीसोबत वेळ व्यतीत कराल. साथीदाराचं सहकार्य मिळेल. 

कन्या - आत्मविश्वास ठेवा. कोणत्याही कामाचा ताण घेऊ नका. अडचणींची कामं पूर्ण कराल. कोणाच्याही विरोधात जाऊ नका. काही कामं इच्छेविरुद्ध करावी लागतील. साथीदाराचं सहकार्य मिळेल.  वायफळ अधिक खर्च होऊ शकतो. मानसिक ताण राहील. अधिक विचार न करणं योग्य ठरेल.

तूळ - कामात पॅशन ठेवा. कामावर प्रेम करा. कामात यश मिळेल. यामुळे वैवाहिक जीवनही चांगले राहिल. कामाचा ताण कमी झाल्यावर कुटुंबाकडे, जोडीदाराकडे लक्ष द्या. दिवस प्रेमाचा आहे. 

वृश्चिक - लग्नाचा विचार करत असाल तर आजच्या दिवसांत कुणा खास व्यक्तीला भेटा. त्या व्यक्तीमध्ये रुची वाढेल. कामातून आनंद मिळेल. मनासारखं काम केल्याचं समाधान मिळेल. दिवस चांगला जाईल. 

धनू - आजचा दिवस हा उत्साही, रोमांचक आणि आनंदी जाईल. आजच्या दिवसात काम देखील मनासारखं होईल. आणि जोडीदाराला देखील मनासारखा वेळ द्याल. नवीन गोष्ट सुरू करण्याचा विचार करत असाल तर नक्की करा. 

मकर - आजचा दिवस तुमचा आहे. जोडीदाराच्या शोधात असाल तर तो शोध आज संपेल. व्यवसायात किंवा नोकरीत आजचा दिवस थोडा खडतर असेल. पण दिवसाच्या शेवटी कामातून भरपूर आनंद आणि समाधान मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींकडे लक्ष द्याल.

कुंभ - आज तुम्ही प्रेम आणि दृढ विश्वासावर अवलंबून असाल. पण प्रेमात आज थोडी नाराजी स्विकारावी लागेल. काम मनाप्रमाणे कराल. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता अधिक. शरिराकडे लक्ष द्या. आजूबाजूच्या बदलांमुळे त्रास होण्याची शक्यता. 

मीन - आज तुम्ही सल्ले देण्यासाठी उत्सुक असाल. आजचा दिवस अतिशय चांगला आहे. कामातून आनंद मिळेल. त्याचप्रमाणे व्यवसाय करणाऱ्यांसाठी थोडा खडतर दिवस आहे. स्वास्थ चांगल असेल. पण लक्ष द्या. आज मन प्रसन्न राहिल.