भरभराट की ठणठण गोपाळ, नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं असणार?

नवं वर्षात या तीन राशीवर शनी राशीची कृपा, पाहा तुमची रास आहे का?

Updated: Dec 24, 2021, 05:02 PM IST
भरभराट की ठणठण गोपाळ, नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं असणार? title=

मुंबई : शनी आता मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. 29 एप्रिलपासून शनी मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्याचा परिणाम तीन राशींवर होणार आहे. त्यानंतर शनी कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. मात्र त्याआधी शनी ग्रहाची कृपा कोणत्या 3 राशींवर असणार आहे पाहूया. 

मेष : मेष राशीच्या लोकांसाठी पैशांच्या समस्या दूर होणार आहेत. 4 महिन्यांत या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होणार आहे. मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात वातावरण खूप चांगलं राहणार आहे. 

कर्क : या राशीच्या लोकांसाठी 29 एप्रिलपर्यंत कामात मोठं यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल. मान-सन्मान मिळेल.

कन्या : कन्या राशींसाठी 2022 च्या सुरुवातीचे 4 महिने खूप चांगले असणार आहेत. प्रसिद्धी करण्याचा सर्वोत्तम चान्स असणार आहे. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. 

इतर राशींवर याचा संमिश्र प्रभाव पडणार आहे. काही राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे थोडी सावधगिरी बाळगणं गरजेचं असणार आहे. 

Disclaimer: दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. झी 24 तास याची पुष्टी करत नाही.