Horoscope 22 December 2021 : 'या' राशींच्या लोकांकरता आजचा दिवस शुभ

असा असेल आजचा दिवस 

Updated: Dec 22, 2021, 07:28 AM IST
Horoscope 22 December 2021 : 'या' राशींच्या लोकांकरता आजचा दिवस शुभ title=

मुंबई : कर्क राशीच्या लोकांना वाईट संगत टाळण्याचे निर्देश दिले. तूळ राशीच्या लोकांना नवीन लोक भेटण्याची शक्यता आहे, ज्यातून लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. कुंभ राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

मेष : आजचा दिवस आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येणार असल्याचे सांगितले जातात. बुद्धिमत्तेने केलेली कामे पूर्ण होतील. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही घरातील सदस्यांशी बसून चर्चा कराल. सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील.

मिथुन : आज दिवसाच्या सुरुवातीला थोडी सुस्ती राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल. आर्थिक बाबतीत काळजी घ्यावी लागेल. घाऊक विक्रेत्यांनी यावेळी मोठ्या प्रमाणात माल टाकू नये.

कर्क : आज लोकांना त्यांचे मत व्यक्त करण्यापासून रोखू नका. तुमची गुणवत्ता सतत सुधारण्यासाठी प्रयत्नशील राहा. लेखकांना काही चांगली बातमी मिळू शकते. वेळेचा पुरेपूर वापर करा आणि वाईट संगत टाळा. तरुणांनी पालकांच्या सूचनांचे पालन करावे.

सिंह : आज तुमचे तारे उच्चस्थानी असणार आहेत. उत्पन्न वाढल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आपत्कालीन कामाच्या आगमनामुळे, नियोजित योजनांमध्ये बदल होऊ शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराला भेटवस्तू देण्याचे वचन देऊ शकता.

कन्या : तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण कराल. भेटवस्तू आणि सन्मानाचा लाभ मिळेल. कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आर्थिक संकट टाळण्यासाठी फालतू खर्च थांबवावा लागेल. संघर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही.

तूळ : व्यवसायातील मागील कामे मार्गी लावण्यासाठी आजचा काळ उत्तम असल्याचे सांगतात. तुम्हाला काही नवीन लोक भेटतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. रिअल इस्टेट खरेदी करण्याची योजना बनवू शकता. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

वृश्चिक :  आज कोणत्याही नवीन बदलासाठी स्वतःला तयार ठेवा. कामात थोडी परिपक्वता आणि गांभीर्य दाखवा. कामात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. करिअरशी संबंधित अडचणी दूर होतील.

धनु : आजचा दिवस आनंदात जाईल असे गणेश सांगतात. पैशाबाबत मनात अनेक प्रकारचे विचार येऊ शकतात. व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन मार्गांचा विचार कराल. मौल्यवान वस्तू खरेदीसाठी वेळ अनुकूल राहील. अधिकारी तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात.

मकर : आज तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुगंध दरवळेल असे गणेश सांगतात. तुमची प्रतिभा आणि क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांना बढती मिळण्याची चिन्हे आहेत. आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर काही बाबतीत दिलासा मिळेल.

कुंभ :  आज तुमच्या विचारांमध्ये बदल दिसेल. व्यावसायिक योजना उत्साहाने पूर्ण कराल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. तरुण करिअरमध्ये चांगले पर्याय शोधतील. वैवाहिक चर्चेत यश मिळेल.

मीन : आज तुमचे बोलणे तुमचे वरदान असल्याचे गणेश सांगतात. कपड्यांच्या व्यापार्‍यांसाठी हा दिवस निराशेचा ठरू शकतो. झटपट नफा मिळवण्याच्या नादात चुकीच्या पद्धतींचा अवलंब करू नका. कौटुंबिक समस्या सुटतील. महिला घराच्या साफसफाईमध्ये व्यस्त राहतील.