राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींची आर्थिक चणचण संपणार

मेहनत करा, फळ मिळेल 

Updated: Oct 22, 2020, 06:51 AM IST
राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींची आर्थिक चणचण संपणार
संग्रहित छायाचित्र

मेष - धनलाभ होण्याची शक्यता आहे. शत्रूला नमवण्यात यशस्वी ठराल. नोकरीच्या ठिकाणी प्रगती करण्याची संधी आहे. मित्रांची मदत मिळेल. विवाहप्रस्तावही मिळतील. 

वृषभ- तुमच्या कामाचा इतरांवर प्रभाव असेल. प्रवासयोग आहे. जुने वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. 

मिथुन- आर्थिक परिस्थिती सुधारेल. अर्थार्जनाच्या नव्या संधी मिळतील. तुमच्या मर्जीतील कामं करण्यासाठी उत्सुक असाल. सर्वकाही सुरळीत पार पडणार आहे. 

कर्क- तुमचं पूर्ण लक्ष करिअरवर आणि अर्थार्जनाच्या नव्या संधीकडे असणार आहे. कुटुंबासमवेत चांगला वेळ व्यतीत कराल. सकारात्मक घटना घडतील. 

सिंह- सामाजिक स्तर उंचावेल. वेळ चांगला आहे. धनलाभाचा योग आहे. आर्थिक चणचण संपेल. नवी जबाबदारी मिळेल. 

कन्या- तुमच्यासाठी आजचा दिवस सर्वसामान्य आहे. मेहनत जास्त करावी लागू शकते. कुटुंबासमवेत चांगला वेळ व्यतीत कराल. 

तुळ- तुमचं कोणतंही काम अडणार नाही. संकोचलेपणा दूर होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. सोबत असणाऱ्यांची मदत होणार आहे. 

वृश्चिक - महत्त्वाच्या व्यक्तींशी असणारं नातं आणखी दृढ होईल. आर्थिक चणचण सुधारेल. कुटुंबात एकी राहील. 

धनु- कुटुंबात एखादी आनंदवार्ता कळेल. नोकरीच्या ठिकाणी बढतीची संधी आहे. दिवस चांगला आहे. थकवा जाणवू शकतो. 

मकर- व्यापार आणि नोकरीमध्ये चांगल्या संधी आहेत. आर्थिक अडचणी दूर होतील. नवं घर खरेदी करण्यासाठी पुढाकार घ्याल. 

 

कुंभ- जास्तीचं काम हाती घ्याल. अडचणी दूर होतील. इतरांची मदत करण्यातच तुम्हाला आनंद मिळणार आहे. विचाराधीन कामं पूर्ण होतील. 

मीन- तुमच्या जीवनात कोणता एक महत्त्वाचा बदल होणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. शुभवार्ता मिळेल.