Guru Vakri: वृषभ राशीत गुरु होणार वक्री; 'या' राशींना मिळणार सकारात्मक प्रभाव

Jupiter Retrograde 2024: गुरु ग्रह 1 मे रोजी तो वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 9 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:01 वाजता गुरु ग्रह वृषभ राशीत वक्री होणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jan 12, 2024, 07:25 AM IST
Guru Vakri: वृषभ राशीत गुरु होणार वक्री; 'या' राशींना मिळणार सकारात्मक प्रभाव title=

Jupiter Retrograde 2024: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, गुरु ग्रह ठराविक काळानंतर राशी बदलतो. बृहस्पतिच्या राशीतील बदलाचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर काही ना काही परिणाम होताना दिसतो. गुरु ग्रहाला एकाच राशीत परत येण्यासाठी पूर्ण १२ वर्षे लागतात. यावेळी, बृहस्पति स्वतःच्या मेष राशीमध्ये आहेत. 

गुरु ग्रह 1 मे रोजी तो वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 9 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:01 वाजता गुरु ग्रह वृषभ राशीत वक्री होणार आहे. बृहस्पतिच्या उलट्या हालचालीमुळे काही राशींना लाभ मिळणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळणार ते पाहुया.

कर्क रास (Kark Zodiac)

या राशीच्या अकराव्या घरात गुरु वक्री होणार आहे. या राशीमध्ये गुरु नवव्या आणि सहाव्या घराचा स्वामी आहे. अशा स्थितीत बृहस्पति वक्री झाल्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्हाला व्यवसायातही भरपूर नफा मिळू शकतो. वर्षाच्या शेवटी तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात.

वृश्चिक रास (Vraschik Zodiac)

या राशीच्या सातव्या घरात गुरु वक्री होणार आहे. याचा तात्काळ लाभ मिळू शकत नाही. पण येत्या काही वर्षांत खूप पैसा मिळेल. बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्हाला व्यवसायात प्रचंड यश मिळेल. गुरु तुम्हाला प्रत्येक कार्यात यश देऊ शकतो. पालकांना त्यांच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होणार आहे.

धनु रास (Dhanu Zodiac)

गुरु ग्रह सहाव्या घरात वक्री असणार आहे. अशा परिस्थितीत या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुम्ही देश-विदेशात पर्यटनासाठी जाऊ शकता. आयुष्यातील अनेक संकटं दूर होऊ शकतात.  तुम्हाला दीर्घकाळ प्रलंबित डील मिळू शकते. तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये विजय मिळू शकणार आहे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )