वरिष्ठ पोलिस अधिकारी हॉटेलमध्ये महिला कॉन्स्टेबलसह नको त्या अवस्थेत आढळला; खात्याने घडवली अद्दल अन् आता…

पोलिस उपअधीक्षक कृपाशंकर कनौजिया तीन वर्षांपूर्वी एका हॉटेलमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळले होते. आपली ही चूक त्यांना प्रचंड महाग पडली असून त्यांचं डिमोशन करत कॉन्स्टेबल करण्यात आलं आहे.

शिवराज यादव | Updated: Jun 23, 2024, 06:17 PM IST
वरिष्ठ पोलिस अधिकारी हॉटेलमध्ये महिला कॉन्स्टेबलसह नको त्या अवस्थेत आढळला; खात्याने घडवली अद्दल अन् आता… title=

एका हॉटेलमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडल्याच्या तीन वर्षांनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी उपअधीक्षक कृपा शंकर कन्नौजिया यांचं डिमोशन केलं आहे. त्यांना पोलिस उपअधीक्षक पदावरून थेट कॉन्स्टेबल पदावर आणण्यात आलं आहे. कृपाशंकर कनौजिया यांनी यापूर्वी  उन्नावमध्ये सर्कल ऑफिसर (CO) बिघापूर या पदावर काम केलं होतं. त्यांना आता गोरखपूरमधील 26 व्या प्रांतीय सशस्त्र कॉन्स्टेब्युलरी (PAC) बटालियनमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. जुलै 2021 मध्ये रजेवर गेल्यापासून ते बेपत्ता आहेत. तेव्हापासूनच त्यांचा पडता काळ सुरू झाला आहे. 

कृपा शंकर कन्नौजिया यांनी कौटुंबिक कारणास्तव रजा मागितली होती. पण रजा घेतल्यानंतर घरी जाण्याऐवजी ते महिला कॉन्स्टेबलसह कानपूरमधील एका हॉटेलमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी आपले खाजगी आणि अधिकृत दोन्ही मोबाईल नंबर बंद केल्याने संशय बळावला होता.

 

पती अचानक बेपत्ता झाल्याने त्यांचे कुटुंबीय चिंचेत होते. यानंतरसीओच्या पत्नीने मदतीसाठी उन्नावच्या  एसपीशी  संपर्क साधला. सर्विलियन्स टीमने तपास केला असता कानपूर हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर कनौजिया यांचे मोबाइल नेटवर्क काम करणे बंद झाल्याचे लक्षात आले. यानंतर उन्नाव पोलीस त्वरीत हॉटेलमध्ये पोहोचले, जिथे त्यांना सीओ आणि महिला कॉन्स्टेबल एकत्र आढळले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघेही हॉटेलात प्रवेश करताना आढळले होते. यामुळे पोलिसांच्या हाती महत्वपूर्ण पुरावा लागला होता.

 

या घटनेनंतर शासनाला अहवाल सादर करण्यात आला. सखोल आढावा घेतल्यानंतर सरकारने कृपा शंकर कनौजिया यांना कॉन्स्टेबल पदावर आणण्याची शिफारस केली. एडीजी प्रशासनाने तातडीने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. परिणामी एकेकाळचे प्रमुख अधिकारी पदच्युत झाले आणि आता कनिष्ठ पदावर पोहोचले आहेत.