close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | मंगळवार | १५ ऑक्टोबर २०१९

जाणून घ्या तुमच्या राशीचं भविष्य 

Updated: Oct 15, 2019, 07:55 AM IST
आजचे राशीभविष्य | मंगळवार | १५ ऑक्टोबर २०१९

मुंबई : नक्षत्र कायम आपल्या वेळेत बदलत असतात. या नक्षत्रांच्या आपल्या जीवनावर चांगला/वाईट असा परिणाम होत असतो. जाणून घ्या काय आहे आजचे तुमचे भविष्य 

मेष - या राशीच्या लोकांना मित्रपरिवाराकडून आणि भावांकडून सहयोग मिळेल. नवीन काम सुरू होतील तसेच विचार केलेली काम सर्व पूर्ण होतील. संपत्तीच्या कामावर लक्ष ठेवा. व्यवहारात चांगले यश मिळेल. आरोग्याच्याबाबतीत काळजी घ्या. 

वृषभ - काही नकारात्मक गोष्टीत अडकलात तर महत्वाची संधी गमवाल. आज कोणताच महत्वाचा निर्णय घेऊ नका. स्वभावात थोडा गोंधळलेलापणा आढळेल. आजचा दिवस थोडा सावधानीचा आहे. विचार करून बोला. समोरच्याच बोलणं ऐकून घ्यायला शिका. 

मिथुन - नवीन काम आणि नवीन बिझनेस डील समोर येऊ शकते. प्रश्नांशी दोन हात करण्यासाठी आजचा दिवस महत्वाचा असेल. आजच्या दिवशी काही नवीन ऑफर मिळेल. विचार केलेली महत्वाची काम आज सुरू होऊ शकतात. 

कर्क - प्रिय व्यक्तीसोबत गैरसमज होऊ शकतात. कोणत्याही बाबतीत निष्काळजीपणा करू नका. नोकरी आणि व्यवसायाच्याबाबतीत कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. विचार केलेल्या कामाला पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागेल. काही कामांकरता मेहनत अधिक करावी लागेल. 

सिंह - विचार केलेली काम आज पूर्ण होणार नाहीत. कोणत्यातरी वेगळ्याच विचारात आज तुम्ही व्यस्त असाल. पैसे सांभाळून ठेवा. देवाण-घेवाण करताना विचार पूर्वक काळजी घ्या. मनात काही समस्या असेल तर चिंतेत दिवस जाईल. आज नवीन काम करू नका जुनी हातातली काम संपवून टाका. 

कन्या - व्यवसायात काही नवीन योजनांवर काम सुरू होईल. जोडीदाराकडून सहयोग आणि सुख मिळेल. प्रिय व्यक्तीसोबतचा आजचा दिवस महत्वाचा असेल. विचार केलेली काही काम आज पूर्ण होतील. आजच्या दिवशी खूप महत्वाच्या व्यक्तींशी भेटगाठी होतील. 

तूळ - आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी चांगला आहे. परिस्थितीचा फायदा घेत आजची काम पूर्ण करू शकाल. आज अचानक चांगली संधी चालून येईल, त्यामुळे याचा लाभ घेण्यासाठी तयार राहा. आजचा दिवस फायदा होऊ शकतो. जोडीदारासोबतचा दिवस अनुकूल असेल. 

वृश्चिक - नोकरी आणि व्यवसायात अचानक काही महत्वाची निर्णय घेऊ शकतात. तसेच नुकसान देखील होऊ शकतो. मानसिक गोंधळ वाढू शकतो. अचानक काही नुकसान होऊ शकतात त्यासाठी तयार राहा. 

धनू - आर्थिक प्रश्न सुटतील. दाम्पत्य जीवन आज सुखकर असेल. आजचा दिवस समजुतदारपणे आणि विनम्रपणे घालवा. रोजच्या कामातून धनलाभ होईल. कर्ज घेण्यासाठी तयार राहा. मोठी समस्या संपू शकते. 

मकर - आज मकर राशीच्या लोकांना सावधान राहावे लागेल. काही लोकं आपल्या स्वार्थासाठी तुमचा त्रास वाढवू शकतात. मनात अनेक उलथापालथ होईल. जुन्या गोष्टींमध्ये अडकण्याचा आजचा दिवस आहे. काही समस्या एका दिवसांत संपतील. 

कुंभ - ऑफिसमध्ये स्वतःवर नियंत्रण ठेवा. पदामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आज ठरवलेली सर्व काम पूर्ण होतील. पुढील कामांच नियोजन कराल. योग्यता आणि जुना अनुभव गाठीशी ठेवून आजचा निर्णय घ्या. 

मीन - व्यवसायात काही नवीन करण्याच्या नादात त्रास वाढवून ठेवाल. मनात खूप गोंधळ निर्मा झाला आहे त्यामुळे कामात लक्ष लागणार नाही. नोकरी किंवा व्यवसायात घाई करू नका. काही गोष्टींबाबत प्रोफेशनल लाइफमध्ये समस्या वाढतील.