Leo Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 हे सिंह राशीच्या लोकांसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअर राशीभविष्य

Leo Horoscope 2024 : येणारं नवीन वर्ष 2024 हे सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.

नेहा चौधरी | Updated: Dec 13, 2023, 03:55 PM IST
Leo Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 हे सिंह राशीच्या लोकांसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअर राशीभविष्य title=
Leo horoscope 2024 how will 2024 be for cancer people financial and career horoscope Singh rashifal

Leo Horoscope 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीचा स्वामी हा ग्रहांचा राजा सूर्यदेव आहे. सूर्य हा पिता, आत्मा, सरकारी नोकरी आणि प्रशासनाचा कारक मानला जातो. 1 जानेवारी 2024 साठी सिंह राशीच्या संक्रमण कुंडलीतील ग्रहांची स्थिती असणार आहे. तर चंद्र सिंह राशीत असणार आहे. याशिवाय केतू दुसऱ्या भावात तर बुध आणि शुक्र चौथ्या भावात असणार आहे. मंगळ आणि सूर्य पाचव्या भावात, शनि सातव्या भावात आणि राहू आठव्या भावात तर गुरु नवव्या भावात असणार आहे. त्यामुळे ग्रह-तारे यांची स्थिती अतिशय शुभ असणार आहे. या ग्रहांची स्थिती पाहता 2024 हे वर्ष सिंह राशीसाठी वरदान असणार आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी (Leo Rashifal 2024) 2024 हे वर्ष त्यांच्या करिअर, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनासाठी कसे असेल पाहूयात (Leo horoscope 2024 how will 2024 be for cancer people financial and career horoscope Singh rashifal)

2024 मध्ये सिंह राशीचा व्यवसाय

2024 मध्ये तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळणार आहे. गुरु, केतू आणि शनि तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे या वर्षी तुम्हाला काम आणि व्यवसायात फायदा होणार आहे. नवीन काम सुरू करायचे असेल तर ते मे महिन्यापूर्वी करावे. तुम्हाला वर्षभर आर्थिक लाभ होणार आहे. तसंच आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. नोकरदारांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळणार आहे. 

सिंह राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती 

2024 मध्ये तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. गुरु तुमच्या राशीतून नवव्या भावात स्थित असणार आहे. त्यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. तसंच नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. तर घर, दुकान आणि नवीन ऑफिस घ्यायचे असेल हे वर्ष तुमच्यासाठी लकी आहे.

सिंह राशीच्या लोकांचे करिअर आणि शिक्षण 

वैदिक ज्योतिषानुसार 2024 हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी शुभ असणार आहे. गुरु हा ग्रह तुमच्या राशीच्या नवव्या भावात स्थित असणार आहे.  त्याची दृष्टी तुमच्या राशीच्या पाचव्या भावात असेल. त्यामुळे 1 मे पूर्वी तुम्ही कोणत्याही अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यास तुम्हाला फायदा होईल. शैक्षणिक क्षेत्रातही नाव कमवणार आहात. अभ्यासक्रम पूर्ण केला तर नोकरीची उत्तम संधी तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी सिंह मंगळासोबत पाचव्या भावात असल्याने जवळपास संपूर्ण वर्ष विद्यार्थ्यांसाठी शुभ असणार आहे. 

2024 मध्ये सिंह राशीचे आरोग्य

सिंह राशीच्या लोकांनी नवीन वर्ष आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. कारण राहू ग्रह तुमच्या संक्रमण कुंडलीच्या आठव्या घरात असल्यामुळे तुम्ही कोणत्याही आजाराने ग्रस्त राहणार आहात. त्याच वेळी, आपण मार्च, एप्रिल आणि नोव्हेंबर महिन्यात अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. इजा किंवा अपघात होण्याची भीती आहे.

2024 मध्ये सिंह राशीचे विवाहित जीवन आणि नातेसंबंध

सिंह राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे. शनि ग्रह वर्षभर तुमच्या राशीपासून सातव्या भावात असणार आहे. त्यामुळे अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव मिळणार आहेत. याशिवाय बृहस्पति नवव्या भावात राहूनही लग्नाची शक्यता निर्माण होणार आहे. प्रेमसंबंधांसाठी हे वर्ष उत्तम असणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)