Mahabharat: दानशूर कर्णाचं 'या' ठिकाणी झाले अंत्यसंस्कार, वडाच्या झाडाबाबत आजही आश्चर्य

महाभारत या पौराणिक कथेबाबत तुम्ही ऐकलं, वाचलं असेलच. महाभारतातील प्रत्येक पात्राबाबत कायमच कुतुहूल वाटते. प्रत्येक पात्राची स्वत:चं असं वेगळं अस्तित्व आहे. यापैकी कर्ण हे पात्र कायमच स्मरणात राहणारं आहे. कर्ण त्याच्या दानशूरपणासाठी ओळखला जातो. त्यासोबत शौर्य, वचन आणि मित्रता यातही मागे नव्हता. महाभारत युद्ध सुरु झाल्यानंतर 17 व्या दिवशी दानशूर कर्णाचा मृत्यू झाला.

Updated: Nov 30, 2022, 06:52 PM IST
Mahabharat: दानशूर कर्णाचं 'या' ठिकाणी झाले अंत्यसंस्कार, वडाच्या झाडाबाबत आजही आश्चर्य title=

Karna cremation ground: महाभारत या पौराणिक कथेबाबत तुम्ही ऐकलं, वाचलं असेलच. महाभारतातील प्रत्येक पात्राबाबत कायमच कुतुहूल वाटते. प्रत्येक पात्राची स्वत:चं असं वेगळं अस्तित्व आहे. यापैकी कर्ण हे पात्र कायमच स्मरणात राहणारं आहे. कर्ण त्याच्या दानशूरपणासाठी ओळखला जातो. त्यासोबत शौर्य, वचन आणि मित्रता यातही मागे नव्हता. महाभारत युद्ध सुरु झाल्यानंतर 17 व्या दिवशी दानशूर कर्णाचा मृत्यू झाला. त्याचं शौर्य आणि वचनबद्धता पाहून भगवान कृष्णांनी प्रसन्न होऊन वरदान मागण्यास सांगितलं होतं. तेव्हा कर्णाने भगवान कृष्णाकडे अंत्यसंस्कारासाठी जिथे कुणाचंही अंत्यसंस्कार झालं नाही अशी जागा मागितली. पण भगवान कृष्णांना पृथ्वीवर अशी कोणतीही जागा सापडली नाही, जिथे अंत्यसंस्कार झालं नाही. शोध घेतल्यानंतर त्यांना सूरत शहरातील ताप्ती नदीच्या किनारी एक इंच जमीन सापडली. या ठिकाणी कोणतंही अंत्यसंस्कार झालं नव्हतं. 

1 इंच जमीन आणि बाणावर झालं अंत्यसंस्कार

सूरत शहरातील बराछा भागातील लोकांच्या मते, कर्णाच्या इच्छेनुसार भगवान कृष्ण या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी आले होते. मात्र 1 इंच भूमीवर शव ठेवणं कठीण होतं. त्यासाठी पहिल्यांदा बाण ठेवला गेला आणि त्यानंतर कर्णाचं शरीर ठेवून अंत्यसंस्कार करण्यात आले. आता हे स्थळ तुल्सीबडी मंदिर नावाने प्रसिद्ध आहे.

बातमी वाचा- Astro Tips: एक रुपयाच्या नाण्यामुळे तुमचं भाग्य उजळेल! काय सांगतं ज्योतिषशास्त्र जाणून घ्या 

तीन पानं असलेल्या वडाच्या झाडाबाबत आश्चर्य

मंदिर परिसरात एक तीन पानं असलेल्या वडाचं झालं आहे. हे झाडं हजारो वर्षे जुनं असल्याचं बोललं जातं. आतापर्यंत या झाडाला तीन पानंच आली आहेत. ही तीन पानं ताजीतवानी असतात. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)