मुंबई : यावर्षी बुधवार, १५ जानेवारी या दिवशी मकर संक्रांती आहे. मकर संक्रांती ही अशुभ असते असा आपल्याकडे जो समज आहे. त्यात काहीही तथ्य नाही. सूर्यावे सायन मकर राशीत प्रवेश केला की आपल्याइथे दिनमान वाढत जाते. दिनमान वाढत जाणे हे अशुभ किंवा वाईट कसे असू शकेल ? असा प्रश्न उपस्थित करून पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी मकर संक्रांती सणाचे महत्त्व पटवून सांगितले.
मकर संक्रांती विषयी अधिक माहिती देताना म्हणाले की सूर्याने रविवार, २२ डिसेंबर २०१९ रोजी सायन मकर राशीत प्रवेश केला.. या दिवशी उत्तरायणारंभ म्हणजे सूर्य उत्तरेकडे जाऊ लागला. त्यादिवसापासून आपल्या इथे दिनमान वाढत गेले. या दिवशी आपल्याइथे दिवस १० तास ५८ मिनिटांचा असून रात्र मोठी म्हणजे १३ तास ०२ मिनिटांची होती. आपली पंचांगे ही निरयन पद्धतीवर आधारलेली असल्याने सूर्य निरयन मकर राशीत ज्यादिवशी प्रवेश करतो. त्याप्रमाणे मकर संक्रांतीचा दिवस ठरतो. यावेळी मंगळवार दि. १४ जानेवारी २०२० रोजी उत्तररात्री २ वाजून ८ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत करीत आहे. त्यामुळे निरयन मकर संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दि. १५ जानेवारी २०२० रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे. (15 जानेवारीला 'या' वेळेत मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त)
मकर संक्रांत 15 जानेवारी रोजी म्हणजे बुधवारी असणार आहे. या दिवशी एकमेकांना 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला' असं म्हणत तिळगुळ आणि फुटाणे दिले जातात. मनातील सर्व राग रुसवा दूर करण्याकरता हा सण अतिशय आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी लहान मुलांच बोरनान देखील केलं जातं.