Angarak Yog: मंगळ-राहूच्या युतीने बनला अंगारक योग; 'या' राशींना प्रत्येक कामात मिळू शकतं यश

Angarak Yog In Pisces: अंगारक हा योग चांगला मानला जात नाही. याचं कारण म्हणजे राहू मंगळाची नकारात्मक ऊर्जा वाढवतो. अशा स्थितीत 12 राशीच्या लोकांच्या आयुष्यात राग, उत्कटता इत्यादी वाढतात. मीन आणि रेवती नक्षत्रात हा योग तयार होतोय.

सुरभि जगदीश | Updated: Apr 24, 2024, 10:15 AM IST
Angarak Yog: मंगळ-राहूच्या युतीने बनला अंगारक योग; 'या' राशींना प्रत्येक कामात मिळू शकतं यश title=

Angarak Yog In Pisces: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी भूमिपुत्र मंगळाच्या राशीतील बदलामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ 23 एप्रिल रोजी सकाळी 8.20 वाजता राशी बदलून गुरूच्या राशीत मीन राशीत प्रवेश करणार आहे. याठिकाणी 1 जून 2024 पर्यंत राहणार आहे. मीन राशीत राहु ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत राहू आणि मंगळाच्या संयोगामुळे महाविस्फोट अंगारक योग तयार होणार आहे.

अंगारक हा योग चांगला मानला जात नाही. याचं कारण म्हणजे राहू मंगळाची नकारात्मक ऊर्जा वाढवतो. अशा स्थितीत 12 राशीच्या लोकांच्या आयुष्यात राग, उत्कटता इत्यादी वाढतात. मीन आणि रेवती नक्षत्रात हा योग तयार होतोय. रेवती नक्षत्र हे बुधाचे नक्षत्र आहे. अशा स्थितीत या योगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनात शुभ परिणाम मिळू शकतात. जाणून घेऊया अंगारक योगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक फायदा होणार आहे.

मकर रास (Makar Zodiac)

या राशीमध्ये मंगळ तिसऱ्या भावात भ्रमण करत असून सहाव्या, नवव्या आणि दहाव्या भावात आहे. अंगारक योगाच्या निर्मितीमुळे आत्मविश्वास आणि धैर्य वाढणार आहे. अंगारक योगामुळे तुमच्या शरीरात प्रचंड ऊर्जा निर्माण होईल. तुमच्या नोकरीत तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. हा योग तयार झाल्याने कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामात मेहनत घेतली तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. परदेशात जाण्याचीही संधी मिळू शकते.

वृश्चिक रास (Vraschik Zodiac)

या राशीमध्ये मंगळ पाचव्या भावात भ्रमण करत आहे. याशिवाय हा योग विद्यार्थ्यांसाठी खूप शुभ मानला जातो. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकता. करिअर वाढीसाठी हा काळ खूप चांगला मानला जातो. सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या लोकांना नोकऱ्या मिळू शकतात. तुमच्या व्यवसायाचा विस्तार करणे फायदेशीर ठरू शकते. लग्नासाठी चांगले संबंध येऊ शकतात. 

कर्क रास (Kark Zodiac)

मंगळ नवव्या घरात असेल. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना अंगारक योगाचा विशेष लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांना नवव्या घरात अंगारक योग तयार झाल्यामुळे फायदा होऊ शकतो. अनपेक्षित आर्थिक लाभही होऊ शकतो. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण करू शकता. धार्मिक कार्यात लाभ मिळू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते.  

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )