Navratri 2023 : शारदीय नवरात्र कधी आहे? मुहूर्त, विधी आणि घटस्थापनाची सोपी पद्धत, पाहा Video

Navratri 2023 : सर्वपित्री अमावस्येच्या (sarvapitri amavasya 2023) दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. घरोघरी घटस्थापना (Ghatasthapana 2023) करण्यात येणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 7, 2023, 06:00 AM IST
Navratri 2023 : शारदीय नवरात्र कधी आहे? मुहूर्त, विधी आणि घटस्थापनाची सोपी पद्धत, पाहा Video
Navratri 2023 ghatasthapana Navratri Shubh Muhurat durga pujan vidhi video

Navratri 2023 : गणपतीनंतर हिंदू धर्मात दुसऱ्या मोठा सण म्हणजे शारदीय नवरात्री. देवी दुर्गाच्या नऊ रुपांची पूजा नवरात्रीत केली जाते. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीच्या सणाला सुरुवात (Navratri 2023 Start Date) होते. महाराष्ट्रात घरोघरी घटस्थापना केली जाते. हिंदू पंचांगानुसार यंदा शारदीय नवरात्र सर्वपित्री अमावस्येच्या (sarvapitri amavasya 2023) दुसऱ्या दिवसापासून म्हणजे 15 ऑक्टोबर 2023 (Navratri 2023 Date) पासून सुरु होणार आहे. (Navratri 2023 ghatasthapana Navratri Shubh Muhurat durga pujan vidhi video )

Add Zee News as a Preferred Source

शारदीय नवरात्रीचा शुभ मुहूर्त (Navratri 2023 Shubh Muhurta) 

रविवार 15 ऑक्टोबर 2023 पासून 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत नवरात्रीचा उत्साह असणार आहे. 24 ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजेच दसरा (Dasara 2023 Date) हा सण साजरा करण्यात येणार आहे. 

शारदीय नवरात्रीची तिथी

प्रतिपदा तिथी आरंभ – 14 सप्टेंबर 2023, शनिवारी, रात्री 11:24 वाजता
प्रतिपदा तिथी समाप्ती- 15 ऑक्टोबर, रविवारी, दुपारी 12:32 वाजता

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

घट स्थापना तारीख : 15 ऑक्टोबर 2023, रविवार
घटस्थापना मुहूर्त: 15 ऑक्टोबरला सकाळी 11.44 ते दुपारी 12.30 पर्यंत 

शारदीय नवरात्रीच्या तिथी

15 ऑक्टोबर 2023 - प्रतिपदा तिथी - देवी शैलपुत्री  
16 ऑक्टोबर 2023 - द्वितीया तिथी - देवी ब्रह्मचारिणी 
17 ऑक्टोबर 2023 - तृतीया तिथी - देवी चंद्रघंटा 
18 ऑक्टोबर 2023 - चतुर्थी तिथी - देवी कुष्मांडा  
19 ऑक्टोबर 2023 - पंचमी तिथी- देवी स्कंदमाता 
20 ऑक्टोबर 2023 - षष्ठी तिथी - देवी कात्यायनी 
21 ऑक्टोबर 2023 - सप्तमी तिथी- देवी कालरात्री  
22 ऑक्टोबर 2023 - दुर्गा अष्टमी- देवी महागौरी 
23 ऑक्टोबर 2023 - महानवमी- शारदीय नवरात्रीचा उपवास.
24 ऑक्टोबर 2023 - दशमी तिथी - देवी दुर्गा मूर्तीचे विसर्जन

घटस्थापना पूजा विधी (Ghatasthapana 2023 Puja Vidhi)

1. सर्वप्रथम मातीचे भांडे घ्या. त्यात तीन थरांमध्ये माती घाला आणि 9 प्रकारचे धान्य मातीत टाका आणि त्यात थोडं पाणी घाला.
2. आता एक कलश घ्या. त्यावर स्वस्तिक बनवा. मग मौली किंवा कलावा बांधून ठेवा. यानंतर कलश गंगाजल आणि स्वच्छ पाण्याने भरा.
3. त्यात एक पूर्ण सुपारी, फुलं आणि दुर्वा घाला. तसंच अत्तर, पंचरत्न आणि नाणे देखील टाका.
4. कलशाच्या आत आंब्याची पानं लावा. कलशच्या झाकणावर तांदूळ ठेवा.
5. देवीचं स्मरण करताना कलशाचं झाकण लावा. आता एक नारळ घ्या आणि त्यावर कलवा बांधा. कलशवर स्वस्तिक चिन्ह बनवा.

6. कुंकवाने नारळावर टिळक लावा आणि नारळ कलशावर ठेवा.
7. कलशावर नारळासोबत तुम्ही काही फुलेही ठेवू शकता.
8. दुर्गा देवीच्या स्वागतासाठी हा कलश मंदिरात स्थापन करा.
9. दिवा लावा आणि त्याची पूजा करा. 
10. पहिल्या दिवशी विडाच्या पानाची माळ अर्पण करतात. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More