Neem Karoli Baba : कष्ट करुनही द्रारिद्य पाठ सोडत नाही, मग नीम करोली बाबा यांचे 'हे' 3 उपाय तुम्हाला बनवतील धनवान

Neem Karoli Baba Tips :  उत्तराखंडच्या नीम करोली बाबाचं नाव आज कोणाला माहिती नाही असा व्यक्ती सापडणार नाही. देशासोबतच परदेशातही त्यांची ख्याती आहे. बाबांनी श्रीमंत होण्यासाठी गुरुमंत्र सांगितला आहे. 

Updated: Feb 8, 2023, 07:38 AM IST
Neem Karoli Baba : कष्ट करुनही द्रारिद्य पाठ सोडत नाही, मग नीम करोली बाबा यांचे 'हे' 3 उपाय तुम्हाला बनवतील धनवान
neem karoli baba tips for money and baba neem karoli told these 3 ways to get rich in marathi news

Tips To Become Rich  : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) कायम उत्तराखंडमधील एका आश्रमात जातात. हे आश्रम आहे नीम करोली बाबा यांचं...याच बाबाजींच्या समाधीच्या दर्शनासाठी ती दोघंही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जात असतात. उत्तराखंडमधील ऋषीकेशपासून काही अंतरावर असणाऱ्या (Kainchi dham) कैंची धाम इथं त्यांचा आश्रम आहे. गुरुंजीचा मंत्र हा अनुष्का आणि विराटसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याचा नियमावर ते आयुष्याचा प्रवास करत आहेत. यात बाबांनी श्रीमंतीची गुरुकिल्ली सांगितली आहे. अनेकांना वाटतं आपल्याकडे भरपूर पैसा असावा. आपणही खूप श्रीमंत असावं...मग नीम करोली बाबांनी (Neem Karoli Baba Tips) यांनी तीन मंत्र सांगितले आहे. ते उपाय करा आणि श्रीमंत व्हा. (neem karoli baba tips for money and baba neem karoli told these 3 ways to get rich in marathi news)

Anushka_Virat

 श्रीमंत होण्याचा गुरुमंत्र!

1. ते सांगता की, ज्या व्यक्तीकडे भरपूर पैसा साठवला आहे त्याला श्रीमंत नाही म्हणता येणार. खरा श्रीमंत तो व्यक्ती असतो जो पैशांची खरी किमत जाणतो आणि उपयुक्तता नीट समजतो. जो पैशाचा योग्य वापर करतो तो माणूस खरा श्रीमंत आहे. पैशाचा वापर नेहमी एखाद्याच्या मदतीसाठी केला पाहिजे.

2. दुसरा गुरुमंत्र आहे, पैसा त्याच व्यक्ती जवळ येतो जो व्यक्ती खर्च करतो. याचा अर्थ असा की जर तुम्ही पैसा साठवून ठेवा तर तुमच्याकडे पैसा येणार नाही. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही जेवढा पैसा वाचविण्याचा मार्ग शोधत राहाल तेवढा तो रोज या ना त्या कारणाने खर्च होत जाईल. त्यामुळे बाबा म्हणतात की, पैसे कमविण्यासाठी पैसे खर्च पण करता आले पाहिजे. जो पैसा योग्य वापर करतो तो खरा श्रीमंत व्यक्ती...

3. तिसरा आणि महत्त्वाचा मंत्र म्हणजे जो माणूस चारित्र्य, चांगली वागणूक आणि देवाच्या श्रद्धेने भराल आहे, तो कधीही गरीब असू शकतं नाही. असा माणूस श्रीमंत लोकांपेक्षा श्रीमंत असतो. ज्यांच्यामध्ये हे तीनही गुण आढळतात तो खरा श्रीमंत... बाबा नीम करोली म्हणतात की चारित्र्य, चांगली वागणूक आणि देवावरील श्रद्धा ही माणसाची खरी संपत्ती आहे. हीच खरी संपत्ती मानली आहे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)