नवीन वर्षात 7 अंक असणाऱ्या लोकांसाठी चोहोबाजूंनी आनंद; हे वर्ष 6 आणि 8 साठी कसे असेल ? जाणून घ्या

2023 हे नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं असेल जाणून घ्या... त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कोणते बदल करायचे किंवा कोणत्या गोष्टींचे पालन करायला हवे हे तुम्हाला नक्कीच कळेल.

Updated: Jan 1, 2023, 10:54 AM IST
नवीन वर्षात 7 अंक असणाऱ्या लोकांसाठी चोहोबाजूंनी आनंद; हे वर्ष 6 आणि 8 साठी कसे असेल ? जाणून घ्या title=

New Year Horoscope According To Numerology : आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. हे वर्ष आपल्याला कसं जाईल असा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडला आहे.  यंदाचे हे वर्ष आपल्याला कसं जाईल आणि त्यासोबत आपल्या आयुष्यात काय नवीन होईल किंवा काय चांगलं काम होणार? याशिवाय आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे आज आपण जाणून घेणार आहोत. अंकशास्त्रानुसार कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत काय काळजी घ्यायला हवी आहेत चला तर जाणून घेऊया.  6, 7, 8 या मुलांकाला हे वर्ष कसं असणार आहे. चला जाणून घेऊया...

6 मुलांकाचे वार्षिक राशिफळ

अंक ज्योतिष शास्त्रानुसार, तुमचा जन्म जर कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला असेल. तर तुमचा मूलांक हा 6 आहे. अंक ज्योतिष शास्त्रानुसार 6 मुलांकाचा शासक ग्रह हा शुक्र आहे. शुक्र हा ऐश्वर्या संपत्ती वैभव याच दाता मानला जातो. 6 मुलांक असणारे लोक शांती प्रिय आणि कलाप्रेमी असतात. हे लोक खूप उशिरा म्हातारे होतात किंवा वय झाल्यानंतरही यांचे विचार हे तरुणांसारखेच असतात. त्याच्यामुळे हे सगळ्यांमध्ये उठून दिसतात किंवा यांच्याकडे लोक आकर्षित होतात. मात्र या लोकांना कौटुंबिक मतभेदांना सामोरे जावे लागते. ची आर्थिक स्थिती ही सतत बदलत राहते. मात्र, शुक्राच्या प्रभावामुळे त्यांच्या आयुष्यात सगळ्यात चांगली होणारी एक गोष्ट म्हणजे त्यांच्या आयुष्यात भौतिक सुख सुविधांमध्ये कोणत्याही घट होत नाही. नवीन वर्ष हे या लोकांसाठी खूप चांगलं असणार आहे. मात्र या लोकांना आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल. या लोकांचे कौटुंबिक जीवनही आनंदाचे असेल. कामाच्या ठिकाणी भावुक होऊ नका. 2023 च्या शेवटी तुम्हाला कोणत्या गोष्टीचे नुकसान होऊ शकते.

हेही वाचा : Budh Margi 2023 : नवीन वर्षात 'या' 3 राशींची होईल चांगलीच प्रगती, बुध मार्गीमुळे होणार मोठा फायदा

7 मुलांकाचे वार्षिक राशिफळ

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म हा 7, 16 आणि 25 जन्मतारीख असेल लोकांचा मुलांक हा 7 असतो. अंकशास्त्रानुसार 7 मुलांकाचा शासक ग्रह हा केतू आहे. या लोकांना कोणाचे विचार लवकर पटत नाहीत आणि ते कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास ठेवत नाहीत याशिवाय ते निर्भयी असतात. ते कधीही शांत बसत नाहीत सतत कोणता ना कोणता विचार करत असतात. हे लोक छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करतात. यावर तुम्ही नियंत्रण आणायला हवे. मुलांक सात असलेले लोक जास्त मेहनती आणि दानधर्म करतात. यंदाचे हे वर्ष थोडे मिक्स प्रकारचे असेल. यंदाच्या वर्षी तुम्हाला अनेक संधी उपलब्ध होतील. अत्यंत चांगली असेल. यासोबतच तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. जे लोक रिलेशनशिप मध्ये आहेत ते त्यांच्या नात्याला एक नाव देऊ शकतात. तर काही लोकांचा लग्नाचा योग आहे. 

8 मुलांकचे वार्षिक राशीफळ

ज्या लोकांचा जन्म 8, 17 आणि 26 तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक क्रमांक हा 8 आहे. या लोकांसाठी 2023 हे वर्ष चांगले असणार आहे. हे वर्ष करिअरच्या क्षेत्रामध्ये पुढे जाणाऱ्यांसाठी चांगले असू शकते. यंदाच्या वर्षी जॉब बदलण्याचा विचार करू नका, कारण एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. त्या लोकांना लव लाइफ मध्ये धोका मिळू शकतो. बंद करून कोणावरही विश्वास ठेवू नका. वातावरणात बदल झाल्यास आजारी पडण्याचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे तुम्ही अधिक काळजी घ्यायला हवी. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)