Akshay Tritiya 2024: हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये या दिवशी लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. यावेळी सोनं-चांदी खरेदी करणे शुभ मानलं जातं. यंदाच्या वर्षी अक्षय्य तृतीयेला 2 शुभ राजयोग तयार होणार आहेत. या वर्षी अक्षय्य तृतीयेला काही ग्रहांचा संयोग होणार आहे.
अक्षय्य तृतीयेला शनी मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत असल्यामुळे शश राजयोग निर्माण होणार आहे. दुसरीकडे वृषभ राशीत चंद्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. हे दोन्ही योग एकत्र बनल्यामुळे काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद होणार आहे. चला जाणून घेऊया अक्षय्य तृतीयेला कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे.
मेष राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. या काळात प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येते. याशिवाय या व्यक्तींच्या संपत्तीत वाढ होणार आहे. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. व्यवसायात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. राजकारणाशी संबंधित असलेल्यांना चांगला लाभ मिळू शकतो.
या राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस खूप चांगला आहे. या राशीत गजकेसरी योग तयार होणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा कालावधी फायदेशीर ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडणार आहेत.
मीन राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस खूप फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या विचारांनी इतरांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकता. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाणार आहे. कार्यालयीन वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होऊ शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )