Shukra Gochar: वैदिक ज्योतिषात, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी शुक्र ग्रह वैवाहिक जीवन, वासना, सुख, संपत्ती इत्यादींचा कारक मानला जातो. शुक्र हा देखील माता लक्ष्मीचा कारक मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत असते त्यांना प्रत्येक कामात यश मिळतं.
ज्योतिष्य शास्त्रानुसार, 12 जून रोजी शुक्र आपली राशी बदलणार आहे. वृषभ राशीतून मिथुन राशीत गोचर होईल. शुक्राच्या हालचालीतील बदलामुळे सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. काहींना फायदा होईल तर काहींना नुकसान होणार आहे. जाणून घेऊया या काळात शुक्राच्या राशी बदलामुळे कोणते शुभ परिणाम दिसून येणार आहेत.
शुक्राचे हे गोचर मेष राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नसणार आहे. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. व्यवसाय आणि करिअरमध्ये फायदा होणार आहे. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. संशोधन करणाऱ्या लोकांना यश मिळणार आहे.
शुक्राचे हे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. नवीन घर खरेदीची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होईल. नशीब पूर्ण साथ देईल. प्रवासाची शक्यता आहे. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज आहे.
मिथुन राशीच्या लोकांना या काळात आर्थिक लाभ होणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. हे संक्रमण रसिकांसाठीही अनुकूल ठरणार आहे. कुटुंबात सुख शांती नांदू शकणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला जाणार आहे.
सिंह राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण अनुकूल राहणार आहे. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देश आणि परदेशातही प्रवास करू शकता. या काळात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात काही समस्या असतील, पण काही वेळात त्यावर उपाय निघतील. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )